शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दोन वर्षांत बारा शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: April 16, 2017 23:14 IST

जत तालुक्यातील स्थिती : दुष्काळाचा फेरा सुटता सुटेना; धक्कादायक घटनांची मालिका कायम

जयवंत आदाटे ल्ल जतकर्जाला कंटाळून व कूपनलिकेला पाणी न लागल्याने खिलारवाडी (ता. जत) येथील शेतकरी दाम्पत्याने एकाचवेळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील वास्तव समोर येऊ लागले आहे. मागील दोन वर्षात येथील बारा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.भौगोलिक असमतोल, कमी प्रमाणात पडणारा पाऊस व जवळपास बारमाही वाहणारी नदी नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करावा लागत आहे. बॅँका आणि पतसंस्था व खासगी सावकारांचे थकीत कर्ज, फळबागेतील उत्पन्नातून आलेले नुकसान, कूपनलिकेचे अचानक बंद झालेले पाणी, नवीन कूपनलिकेस पाणी न लागणे आदी कारणांमुळे येथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करण्याच्या धक्कादायक घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. परंतु शासनस्तरावर त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. शासनाने कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करून, त्यांना आत्महत्येपासून परावृृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र हा सधन भाग समजला जात आहे. त्यातील जत तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याने येथील वास्तव हळूहळू समोर येऊ लागले आहे. २०१५ मध्ये येथील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०१६ मध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर २०१७ मध्ये एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. जत तालुक्यास वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले, तर तालुक्याच्या काही भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. येथील राजकारण आजपर्यंत म्हैसाळ योजनेभोवती फिरत राहिले. प्रत्येक निवडणुकीत त्याचा राज्यकर्त्यांनी सोयीस्करपणे वापर केला. टोकाचा राजकीय संघर्ष, राजकीय अनास्था यामुळे म्हैसाळ योजनेचे काम आजपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी...नाव वय गाव तारीखमधुकर गोविंद घेरडे ४८ काशिलिंगवाडी १0-२-२0१५भगवान तुकाराम शिंदे २८शेगाव ८-४-२0१५शिवकांत रेवाप्पा चनगोंड ४० जाडरबोबलाद १६-९-२0१५श्रीकांत कोंडीबा चौगुले ३५ दरीबडची ३-११-२0१५रमेश लिंगाप्पा पुजारी ४० गुड्डापूर १-११-२0१५संजय ज्ञानू पांढरे ३५ कुडनूर ९-१२-२0१५आप्पासाहेब तम्माण्णा हुबळी ४० बिळूर ३१-५-२0१६मारुती मल्लाप्पा हळगे ४५ डफळापूर३0-८-२0१६आप्पासाहेब परकाप्पा मगदूम ३८ सिंदूर२६-५-२0१६बसगोंडा रामाण्णा तंगडी ४२ मुचंडी २६-५-२0१६भैराप्पा आण्णाप्पा कोडलकर ३७खिलारवाडी १४-४-२0१७पदुबाई भैराप्पा कोडलकर ३१ खिलारवाडी १४-४-२0१७