शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात जुन्यांचा अट्टाहास, नव्यांचा हव्यास

By admin | Updated: July 21, 2016 23:59 IST

नगरपालिकेची मोर्चेबांधणी : उमेदवारी निश्चितीसाठी होणार नेत्यांची कसरत; चाचपणीला सुरुवात

दत्ता पाटील --तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवारी निश्चित नसली तरी, इच्छुकांकडून प्रभागात चाचपणीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांचे आरक्षण सोयीचे झाले आहे. त्यामुळे विद्यमान कारभाऱ्यांचा उमेदवारीसाठी अट्टाहास असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसरीकडे काही नवीन चेहऱ्यांनाही उमेदवारीचा हव्यास असून त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची कसरत होणार आहे.तासगाव नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांची संख्या एकवीस झाली आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणातही फेरबदल झाले आहेत. निवडणुकीसाठी अजून अवधी आहे. मात्र आरक्षण जाहीर झाल्यापासून संबंधित इच्छुकांनी आतापासूनच प्रभागावर लक्ष केंद्रित केले आहे. जनतेच्या समस्यांपासून ते व्होट बँक असणाऱ्या समाजापर्यंत सर्वत्र चाचपणीस सुरुवात केली आहे. विद्यमान नगराध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेवक बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर, सुशिला साळुंखे, सारिका कांबळे, शिल्पा धोत्रे, विजया जामदार, शुभांगी साळुंखे यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे, तर नगरसेवक अमोल शिंंदे, शरद मानकर, अजय पवार, अनिल कुत्ते यांच्यापैकी काहींच्या प्रभागात आरक्षणाने पत्ता कट झाला आहे. काहींचे प्रभाग पुनर्रचनेमुळे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सोयीच्या प्रभागाची चाचपणी सुरु आहे. काही ठिकाणी एकाच गटाच्या (विशेषत: भाजपच्या) विद्यमान दोन नगरसेवकांकडून एकाच प्रभागावर डोळा ठेवून मोर्चेबांधणीस सुरुवात आहे. त्यामुळे उमेदवारीवरून रणधुमाळी होणार असल्याचे चित्र आहे. आरक्षणात बदल झाल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांनीही फिल्डिंग लावली आहे. त्यामध्ये विद्यमान नगरसेविका अनुराधा पाटील यांचे दीर सचिन पाटील, नगरसेविका सुशिला साळुंखे यांचा मुलगा अरुण साळुंखे यांची नावे चर्चेत आहेत.यावेळचे निवडणुकीचे चित्र पाहिल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांचा भरणा मोठा आहे, तर काही जुने आणि नवे चेहरेही रिंगणात येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी जोरदार मोर्र्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षाच्या, विशेषत: भाजपमध्ये इच्छुकांचा मोठा भरणा असल्याने नेत्यांना उमेदवारी निश्चित करताना कसरत करावी लागणार आहे, हे नक्की.