शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दसºयादिवशी ३० ते ३५ कोटी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसºयानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असले तरी, अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दसºयाला दोन ते अडीच हजारावर दुचाकी, तर साडेपाचशेवर चारचाकी वाहने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसºयानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याचे दर स्थिर असले तरी, अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दसºयाला दोन ते अडीच हजारावर दुचाकी, तर साडेपाचशेवर चारचाकी वाहने नव्याने रस्त्यावर आली. सांगलीच्या बाजारपेठेत अंदाजे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.बाजारपेठेला खºयाअर्थाने सावरणाºया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाºया दसरा सणाला यावर्षी चांगल्या खरेदीचा अंदाज होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीच्या झळा सहन करणाºया व्यावसायिकांना दसºयाने थोडाफार दिलासा दिला. खरेदीमध्ये सोने-चांदी, दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सध्या सोन्याचा भाव स्थिर असला तरी, म्हणावी तितकी गर्दी सराफ पेठेत दिसत नव्हती. सराफ पेठेत अंदाजे दोन कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल कमीच म्हणावी लागेल.दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्ज पुरवठा केल्याने मोटारसायकली, चारचाकींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये गिअरच्या आणि गिअरलेस अशा दोन्ही प्रकारातील जवळपास दोन ते अडीच हजार गाड्यांची विक्री झाली. तसेच अनेक ग्राहकांनी दसºयाच्या मुहूर्तावर बुकिंग करून दिवाळीला वाहन ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच शेती मशागतीसाठी लागणारे लहान ट्रॅक्टर्स, इतर अत्याधुनिक अवजारांचीही चांगली विक्री झाली.चारचाकी गाड्यांचीही समाधानकारक विक्री झाली आहे. मारुती व नेक्सा कंपनीच्या ३८८ गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सिनीयर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले; तर कंपन्यांच्या गाड्यांची बºयापैकी विक्री झाली असून, अंदाजे ५५० हून अधिक चारचाकी वाहने दसºयादिवशी रस्त्यावर आली आहेत. वित्तीय कंपन्यांकडून दहा हजारावरील कोणत्याही मोबाईलच्या खरेदीसाठी फायनान्स उपलब्ध करून दिल्याने, ज्या ग्राहकाचा किमान दहा हजारांचा मोबाईल खरेदीचा इरादा होता, त्याने थेट वीस हजारापर्यंतचा मोबाईल खरेदी केला. दहा हजाराच्या पुढील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी ही सुविधा उपलब्ध होती.