शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाईल करा बंद, झाडांपासून रहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

अविनाश कोळी/लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वीज पडून माणसे, जनावरे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना दरवर्षी घडतात. या काळात काही प्रमाणात ...

अविनाश कोळी/लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वीज पडून माणसे, जनावरे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना दरवर्षी घडतात. या काळात काही प्रमाणात काही गोष्टींबाबत दक्षता घेतल्यास या आपत्तींपासून बचाव करता येऊ शकतो. सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलचा वीज कडाडताना होणारा वापर अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काही नियमांचे पालन आपल्याला करावे लागेल.

सांगली जिल्ह्यात दरवर्षी वीज पडून मनुष्यहानी व वित्तहानी होते. वीज पडून माणसांबरोबर जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असतात. काहींना अपंगत्व येते तर काही जखमी होतात. यावर्षीही जून महिन्यात जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती ठार तर सहा जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. अशाप्रकारच्या दुर्घटनांमध्ये शेतकरी, शेतमजुरांचा अधिक समावेश आहे. एका अहवालानुसार १९७९ ते २०११ या काळात प्रत्येक पावसाळ्यात वीज पडून ठार होण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.

चौकट

वीज पडत असताना ही घ्या काळजी

विजेचा प्रकाश आणि आवाज यात ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किलोमीटर अंतरावर पडत आहे, अशावेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या.

वीज चमकल्यानंतर मोबाईल बंद करावा. मोबाईल चार्जिंगला लावला असेल तर तो बंद करावा. चार्जरची पीन बाजूला करावी.

खुल्या मैदानात थांबू नये, कारण वीज सर्वात जास्त खुल्या मैदानात पडते.

झाडाखाली, उंच ठिकाणी उभे राहण्याचे टाळा.

विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळही उभे राहणे टाळावे.

शेतात काम करत असाल तर जिथे आहात तिथेच राहावे. पायाखाली लाकूड, कोरडा पालापाचोळा ठेवा.

प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका.

चौकट

अशी मिळेल नुकसानभरपाई

वीज पडून ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार.

१०० तर ६० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाखांची मदत.

वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला एका आठवड्यापेक्षा जादा काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यास १२ हजार ७०० रुपये.

एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ४ हजार ३०० रुपये इतकी मदत मिळणार आहे.