शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या बाजारपेठेत हळद रूसणार

By admin | Updated: January 23, 2017 21:00 IST

सांगली जिल्ह्यात सर्वत्र हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने

 प्रताप महाडिक/ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 23 - जिल्ह्यात सर्वत्र हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने हळदीला अल्प दर दिला जात आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदामे, शीतगृहे, तसेच खासगी गोदामात सुमारे साडेतीन लाख क्विंटल जुनी हळद शिल्लक आहे. आता यंदा सांगलीच्या बाजारपेठेत १० ते १२ लाख क्विं टल हळदीची आवक होण्याची शक्यता आहे. जुन्या हळदीचे दरही गडगडलेले असतानाच आवक वाढल्याने नव्या हळदीचे दरही घसरण्याची शक्यता आहे. सांगलीच्या बाजारपेठेत मागीलवर्षी आडेआठ लाख क्विं टल हळदीची आवक झाली होती. यंदा चांगला पाऊस आणि हवामानामुळे उत्पादनात वाढ झाली. सांगलीत सातारा, हिंगोली, नांदेड, जळगाव जिल्ह्यांसह कर्नाटक, सेलम, निजामाबाद येथून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते.हळदीसाठी एकरी दीड लाख रुपये उत्पादन खर्च होतो. सरासरी उत्पन्न एकरी १५ ते २० क्विं टल आहे. उत्पादन खर्चाबरोबरच वाहतूक, हमाली व तोलाई आदी खर्च विचारात घेतल्यास, प्रतिक्विं टल १० ते १२ हजार रुपये दर मिळाला तरी, हळद उत्पादकांना तोटाच सहन करावा लागतो. तुटपुंज्या भांडवलामध्ये हळदीसारखे उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे होत आहे. विकास सोसायट्या हळदीसाठी ३० ते ३५ हजार रुपये कर्ज देत असल्या तरी, खासगी सावकाराकडून कर्ज काढून, दागिने गहाण ठेवूनच हळद पिकवावी लागते. बाजारपेठेच्या दरासोबत नेहमीच संघर्ष करावा लागतो. यावर्षी २६ जानेवारीनंतर सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळद येणार आहे. प्रारंभीच्या सौद्याला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.हळदीला रामराम गेल्या अनेक वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी निराश होऊन चालूवर्षी बियाणांसहीत हळद शिजवली आहे. हे शेतकरी आता कंटाळून हळदीला कायमचा रामराम ठोकून अन्य पिके घेण्याच्या विचारात आहेत.निर्यातीवर निर्बंध नाहीतहळद निर्यातीवर सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. तरीही हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. हळदीचे औषधी व आयुर्वेदिक महत्त्व अधिक आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यात लक्ष घातले, तर निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरवर्षी देशातील मागणी आणि परदेशात निर्यात होणारी हळद, असे ६० लाख क्विं टल हळदीचे उत्पन्न पुरेसे आहे, परंतु देशात ८० ते ८५ लाख क्विं टल हळदीचे उत्पन्न होत आहे. विक्री होणाऱ्या हळदीपेक्षा उत्पन्न वाढल्याने हळदीचे दर घसरत आहेत.- राजू मेनकर, हळद व्यापारी, सांगलीसोन्यासारखी पिवळी धमक असणाऱ्या हळदीचा रंग फिका पडू लागला आहे. पूर्वी सोन्याच्या बरोबरीने असणाऱ्या हळदीचे दर गेल्या चार वर्षात घसरलेलेच आहेत. हळद उत्पादकांना उत्पादन खर्चाइतकीही रक्कम हातात मिळत नाही. दर घसरल्याने आता कित्त्येक शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरविली आहे.- राहुल पाटील, हळद उत्पादक, चिंचणी, ता. कडेगाव