शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची चेन्नई एक्स्प्रेस धावण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

विटा : विटा शहरातील रेवानगर, पंचशीलनगरसह अन्य उपनगरांत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. पालखी मार्ग आणि रेवानगर परिसराचा विकास ...

विटा : विटा शहरातील रेवानगर, पंचशीलनगरसह अन्य उपनगरांत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे. पालखी मार्ग आणि रेवानगर परिसराचा विकास व्हावा, अशी या भागातील लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी काळात विटा शहरासह विविध उपनगरांत विकासाची चेन्नई एक्स्प्रेस धावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. अनिल बाबर यांनी दिली.

विटा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे समर्थक माजी नगरसेवक सीतारामशेठ बुचडे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. बाबर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमर शितोळे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उत्तम पवार, रामचंद्र भिंगारदेवे, उत्तम चोथे उपस्थित होते.

आ. बाबर म्हणाले, कोणाला तरी कमीपणा यावा, यासाठी आम्ही असे कार्यक्रम घेत नाही. २०१४ ला मी हातात शिवबंधन बांधले. त्याचा रंग उडाला, मात्र गाठ ढिली झाली नाही. या भागातील शेतीच्या पाण्यासाठी टेंभू योजनेचा सहावा टप्पा व्हावा, यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. येत्या काही कालावधित हे काम पूर्ण होईल. त्यामुळे परिसरात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होण्यास मदत होणार आहे.

यावेळी माजी नगरसेवक सीताराम बुचडे यांनी आगामी काळात आ. अनिल बाबर यांचे नेतृत्व मानून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. यानंतर आ. बाबर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करणारे सीताराम बुचडे यांच्यासह पंचशीलनगर, रेवानगर उपनगरांतील असंख्य कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी ईश्वरशेठ जाधव, सोमनाथ सुळे, नीलेश गुरव, अनिल औताडे, विजय संकपाळ, अनिल हराळे, प्रकाश पवार, नारायण पवार, दामोदर पवार, मुकुंद लकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - ०२०१२०२१-विटा-शिवसेना : विटा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सीताराम बुचडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा आ. अनिल बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.