शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संस्थांत पैशापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:24 IST

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था ...

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद वार्षिक अधिवेशनाचा समारोप

सांगली : संस्था कोणतीही असो, ती टिकायची असेल, वृध्दिंगत व्हायची असेल, तर योग्य धोरण आवश्यक असते. त्यात आर्थिक संस्था असल्या, तर त्या पैशावर कमी अन् विश्वासावर जास्त चालतात. त्यामुळे ग्राहकांचा, सभासदांचा आणि सर्व घटकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील होते.पाटील म्हणाले, कोणतीही आर्थिक संस्था अधिक कार्यक्षमपणे चालण्यासाठी त्या संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांची आत्मियता आणि विश्वास संपादन केल्यास अधिक प्रभावी काम होऊ शकतो. बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक बॅँकांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅँक हा महत्त्वाचा दुवा आहे. या बॅँका टिकल्या तर शेतकरी टिकणार आहेत.

शेतकरी व त्यांचे अर्थकारण सांभाळण्याचे काम मध्यवर्ती बॅँका करत असतात. सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी, त्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकच महत्त्वाची ठरत असते. सहकारी बॅँकांना नोटाबंदीच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवरही मात करून बॅँकांनी आपली वाटचाल व्यवस्थीत सुरू ठेवली आहे.यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. संजय ठिगळे, डॉ. उल्हास माळकर, बी. जी. कोरे यांच्यासह चार जिल्ह्यांतून आलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक उपस्थित होते.शेतकरी अडचणीतदिनकर पाटील म्हणाले, शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात महत्त्वाची अडचण आर्थिक नियोजन हीच असते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर अभ्यास करून मार्ग शोधावेत. आजचे तरूण शिक्षित होत असले तरी, त्यांना व्यवहारज्ञान असेलच असे नसल्याने, त्यावरही आता तज्ज्ञांना मोठे काम करावे लागणार आहे.सांगली येथे शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन समारोप समारंभात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.