शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांना छेडणाऱ्या गुंडास चाकणमध्ये ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:08 IST

सांगली : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील गुंड भावश्या पाटील याने चाकण (जि. पुणे) येथे प्रेमीयुगुलांना छेडणाºया एका गुंडाचा खून केल्याची कबुली दिली आहे. २०११ मध्ये चाकणमध्ये निर्जनस्थळी त्याने या गुंडाचा दगडाने ठेचून खून केला आहे. खून केल्यानंतर त्याने या मृत गुंडाचे रिव्हॉल्व्हर पळविल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. खुनाच्या तपासासाठी ...

सांगली : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील गुंड भावश्या पाटील याने चाकण (जि. पुणे) येथे प्रेमीयुगुलांना छेडणाºया एका गुंडाचा खून केल्याची कबुली दिली आहे. २०११ मध्ये चाकणमध्ये निर्जनस्थळी त्याने या गुंडाचा दगडाने ठेचून खून केला आहे. खून केल्यानंतर त्याने या मृत गुंडाचे रिव्हॉल्व्हर पळविल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. खुनाच्या तपासासाठी गुंडाविरोधी पथक चाकणला रवाना झाले आहे.बारा वर्षांत गुंड भावश्या पाटील याने चार खून, तीन खुनाच्या प्रयत्नांसह चोरीच्या गुन्ह्यांची मालिकाच रचली. आठ वर्षापूर्वी तो इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हिसडा मारुन पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंग-जंग पछाडले, पण सुगावा लागत नव्हता. आठ वर्षाच्या फरारी काळात त्याने रेठरेधरणमधील संताजी पाटील-खंडागळे यांचा घरात घुसून खून केला होता. त्यामुळे पुन्हा पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविली. दोन दिवसापूर्वी त्याला पंढरपुरात जेरबंद करण्यात यश आले होते. सध्या तो चौदा दिवस पोलीस कोठडीत राहणार असल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. इस्लामपूर व गुंडाविरोधी पथक संयुक्तपणे हा तपास करीत आहेत.इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून भावश्याने १८ आॅक्टोबर २०१० रोजी पलायन केले होते. त्यानंतर तो थेट पुण्याला गेला. तिथे तो केटरिंगचा व्यवसाय करीत होता. चाकण परिसरात त्याची उठ-बस असायची. चाकणमधील निर्जनस्थळी प्रेमीयुगुले बसण्यासाठी येतात. तेथे एक गुंड युगुलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटायचा. भावश्याने हा प्रकार तीन-चार वेळा पाहिला. यातून त्याने या गुंडाशी ओळख केली. त्यानंतर चाकणमध्येच निर्जनस्थळी नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला. २०११ मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी या गुंडाचे रिव्हॉल्व्हरही पळविले. हेच रिव्हॉल्व्हर संताजी खंडागळे यांचा खून केल्यानंतर दहशत माजविण्यासाठी वापरले होते. हवेत गोळीबार करीत ‘भावश्या, भावश्या’, असे म्हणत तो त्यावेळी पळला होता.आठ वर्षांपूर्वी केलेल्या खुनाची भावश्याने कबुली दिली असली तरी, मृत झालेला गुंड कोण? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यावेळी चाकण पोलिसांना मृतदेह सापडला होता का? सापडला असेल तर त्याची ओळख पटली होती का? ओळख पटली नसेल तर पोलिसांनी मृतदेहाची छायाचित्रे काढून तो दफन केला असण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा उलगडा करण्यासाठी गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक संजय डोके चाकणला रवाना झाले आहेत. तेथील पोलिसांच्या मदतीने या खुनाचा तपास केला जाणार आहे.रिव्हॉल्व्हरचा शोध घेणारचाकणमध्ये २०११ मध्ये खून केला, असे भावश्या सांगत आहे. खून केल्यानंतर पळविलेल्या रिव्हॉल्व्हरचा वापर त्याने तब्बल पाच वर्षांनंतर २०१६ मध्ये संताजी पाटील-खंडागळे यांच्या खुनावेळी केला. एवढी वर्षे त्याने हे रिव्हॉल्व्हर कुठे ठेवले? त्याचा आणखी कुठे वापर केला का? याचा तपास केला जाणार आहे. पंढरपुरात तो राहत असलेल्या खोलीची झडती घेतल्यानंतर केवळ धार्मिक पुस्तके सापडली. रिव्हॉल्व्हर सापडलेच नाही.