शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पोलीस उपनिरीक्षकावर ट्रक चालकाचा हल्ला

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

उसाने मारहाण : कागदपत्रे मागितल्याचा राग

आष्टा : इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कार्तिकस्वामी शिंदे (वय ३२) हे आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना, गाताडवाडी बस स्टॉपजवळ थांबलेल्या ट्रक चालकास त्यांनी परवाना व इतर कागदपत्रे मागितल्यानंतर ट्रकचालक शहादेव उत्तम पालवे (रा. कोला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याने शिंदे यांना उसाने मारहाण केली, तसेच अंगावर धाऊन येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद आष्टा पोलिसांत दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्याकडे सोमवारी इस्लामपूर-आष्टा या परिसरातील रात्रगस्तीचे काम होते. सरकारी जीप (क्र. एमएच १०/एन ६५६) घेऊन इस्लामपूर शहरात गस्त घालून ते रात्री २.१५ वाजता आष्टा येथे आले. रात्री आष्टा शहरात पेट्रोलिंग करून पुन्हा इस्लामपूरकडे जात असताना गाताडवाडी फाट्यानजीक रात्री तीनच्या दरम्यान आले असता ट्रक (क्र. एमएच १६/ एवाय ५५००) हा बसस्टॉपसमोर लावलेला दिसला. ट्रकचालक गाडीत झोपला होता. त्यास उठवून, ‘तुम्ही रस्त्यात गाडी लावली आहे, त्यामुळे अपघात होऊ शकतो. चोरांचाही धोका आहे’, असे सांगितले. त्यावेळी चालकाने ‘मी गाडी कोठेही थांबवेन व कधीही झोपेन, तुला काय करायचे’ असे उध्दट उत्तर दिले. शिंदे यांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे मागितली. यावर शहादेव पालवे याने, ‘आम्ही काय विनापरवाना गाडी चालवतो काय’, असे म्हणून खाली पडलेल्या उसाने शिंदे यांना मारहाण केली. पोलीस नाईक लुगडे व शिंदे यांनी चालक पालवे यास धरले. आष्टा व इस्लामपूर पोलीस आल्यानंतर त्यास आष्टा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस वर्दी असताना शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पालवे याच्याविरुध्द कलम ३५३, ३३२, ३२३, ३२४ प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे. (वार्ताहर)