शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मार्चच्या महासभेलाही गटबाजीचे विघ्न

By admin | Updated: March 11, 2017 23:17 IST

महापालिकेत अजब राजकारण : वर्षात महापौरांचा पाच मासिक सभांना ‘ब्रेक

’सांगली : सत्ताधारी गटात पडलेली उभी फूट आता महापालिकेच्या कामकाजावर विपरित परिणाम करीत आहे. गेल्या वर्षभरात महापौर हारुण शिकलगार यांनी पाच महासभांना ‘ब्रेक’ लावला असताना पुन्हा गटबाजीच्याच धसक्याने मार्चमध्येही सभा बोलावली नाही. महापालिकेतील सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकसंध असणारा गट आता त्यांच्या पश्चात विस्कळीत झाला आहे. नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर गटाने मदन पाटील गटाची गोची केली आहे. गेल्या वर्षभरात या गटाने अनेकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच महापौर हारुण शिकलगार यांनी सध्या सावध राजकीय पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महासभेतील संघर्ष आणि कुरघोड्या अंगलट येऊ नयेत म्हणून शिकलगार यांनी महासभाच न घेण्याचे नवे धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या या धोरणाचा फटका दैनंदिन कामाला बसत आहे. मार्च महिन्यातही त्यांनी महासभा न घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. उपमहापौर गटाने राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्य साथीने स्थायी समिती निवडणुकीत झटका दिला. बहुमत असूनही काँग्रेसच्या अणि मदन पाटील गटाच्या फुटीने स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ. संगीता हारगे यांनी बाजी मारली. त्यामुळे तर आता शिकलगार अल्पमतात आले आहेत. यातूनच त्यांनी गेल्या तेरा महिन्यात केवळ सात वार्षिक सभा घेतल्या. (प्रतिनिधी)महत्त्वाच्या सभेलाच खंडअर्थसंकल्पाला अंतिम स्वरुप देण्याचा हा काळ आहे. त्यामुळे मार्चमधील महासभा ही महत्त्वाची ठरते. अर्थसंकल्पातील तरतुदींवर अभ्यास करून सदस्यांना मते मांडता येतात. त्याचबरोबर काही सूचना देऊन नव्या तरतुदी करता येतात. मार्चची महासभा झाली नाही, तर प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार पावले टाकून नंतर अंतिम अंदाजपत्रक तयार करावे लागेल.