शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात ‘तिरंगी’मुळे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:16 IST

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात २.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवेळी ७२.२२ टक्के मतदान झाले ...

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात २.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवेळी ७२.२२ टक्के मतदान झाले होते. पण यंदा ६९.८५ टक्के मतदान झाले आहे. हा घटलेला टक्का कोणाला धक्का देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. गतवेळी दुरंगी लढत आणि मोदी फॅक्टर दिसून आला होता. मात्र यावेळी मोदी फॅक्टरपेक्षा स्थानिक आणि जातीय समीकरणांचा प्रभाव दिसून आला.मागील निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मोठ्या अटीतटीने लढत झाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. खासदार पाटील यांना ३८ हजार १२८ मतांचे अधिक्य मिळाले होते.यावेळी आर. आर. पाटील यांची पोकळी राष्टÑवादीला जाणवली. गत निवडणुकीत मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून खासदार पाटील यांनी होमपीचवर मताधिक्य मिळविण्यासाठी ताकद लावली होती. कार्यकर्त्यांची फळी त्यासाठी सुरुवातीपासूनच कामाला लावली होती. गेल्या पाच वर्षात राज्य आणि केंद्रातील नेत्यांना आणून वातावरण निर्मिती केली होती. कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या पाच वर्षात खासदार पाटील यांनी स्वत:चा गट तयार केल्याने, यावेळी या ठिकाणीही चांगली लढत देण्याचा प्रयत्न झाला.याउलट राष्टÑवादीच्या गोटातील परिस्थिती होती. नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. विशाल पाटील यांची मदार राष्टÑवादीवरच होती. मात्र जातीय समीकरणांनी रंग भरल्यामुळे राष्टÑवादीत फाटाफूट झाल्याचे चित्र दिसून, काही समाजांची व्होट बँक गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी गेल्याचे चित्र होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा, जातीय समीकरण यामुळे रंगतदार झालेल्या लढतीत मतांची झालेली फाटाफूट कोणाला मताधिक्क्य देऊन जाणार, याचा कौल निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.घोरपडेंची नाराजी दूर... तरीही उलट-सुलट चर्चामाजी मंत्री अजितराव घोरपडेंचा पाच वर्षांपासूनचा दुरावा दूर करण्यात संजयकाकांना यश आले असले तरी, त्यांच्या गटाच्या एकसंध मतदानाबाबत उलटसुलट चर्चा आहे.