शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:11 IST

मिरजेत तयारी : नायकवडी गटाची प्रतिष्ठा पणाला

मिरज : मिरजेत महापालिकेच्या प्रभाग ३० मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या कन्या नाजिया शेख-नायकवडी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने नायकवडी गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रभाग ३० मध्ये अपवाद वगळता इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व राहिले आहे. जात प्रमाणपत्राबाबत तक्रारीमुळे आयेशा नायकवडी यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने गतवेळी इच्छुक असलेले शमशोद्दीन सय्यद यांच्या पत्नी सायराबानू सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. दर्गा परिसरातील या प्रभागात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे. सुमारे ७० टक्के मुस्लिम मतदारात मतांची विभागणी होणार असल्याने शुभांगी रुईकर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने येथे उमेदवार दिलेला नाही. भाजप, शिवसेनेची युती असली, तरी आमदार सुरेश खाडे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी साजीद पठाण यांची निवड रद्द झाल्यानंतर इद्रिस नायकवडी यांच्याविरोधात चांगली मते घेतली होती. शह-काटशहच्या राजकारणामुळे मिरजेत दर्गा परिसर नेहमीच चर्चेत आहे. पठाण आणि नायकवडी यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. राष्ट्रवादीने नायकवडी विरोधकांना एकत्र करुन निवडणुकीत रंग भरला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले असले तरी राजकीय डावपेचात नायकवडी तरबेज आहेत. त्यामुळे नायकवडी यांना राष्ट्रवादी कशी टक्कर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इद्रिस नायकवडी यांचे अस्तित्व या पोटनिवडणुकीत पणाला लागले आहे. सत्ताधारी महापालिकेतील पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत असले तरी, मिरज पॅटर्नमुळे निवडणूक समीकरणे बदलणार आहेत. शहरात एकाच प्रभागातील पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांची नेतेमंडळी उतरणार असल्याने पोटनिवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)जयंत पाटील गटाने कंबर कसलीराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी नायकवडी घराण्यातील सदस्य निवडून येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तरीही नायकवडी कुटुंबातील तीन सदस्य निवडून आले. त्यानंतरच्या काळात नायकवडी व जयंत पाटील यांच्यात समेट झाला. मात्र आता पोटनिवडणुकीत नायकवडी गटाच्या पाडावासाठी जयंत पाटील गटाने पुन्हा कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे नेते व नायकवडी विरोधकांनी सायराबानू सय्यद यांना बळ दिले आहे. इलियास नायकवडी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असले तरी प्रभागात ते घरातील उमेदवारासोबत राहणार असल्याचे सांगितले जाते.