शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

सांगलीत पाऊण तास वाहतूक ठप्प

By admin | Updated: March 22, 2015 00:22 IST

वाहनधारकांचे हाल : मुख्य रस्त्यांवर गर्दी

सांगली : शनिवारच्या बाजारात झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हरभट रोड, मारुती रोड, टिळक चौक, गणपती मंदिर आणि आयर्विन पुलावरील वाहतूक ठप्प झाली. तब्बल पाऊण तास शेकडो वाहने या मार्गावर खोळंबल्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले. वाहतूक पोलीसही जागेवर नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. सांगलीच्या कापड पेठ, बालाजी चौक या मार्गावर नेहमीप्रमाणे शनिवार बाजार भरला होता. सायंकाळी बाजारात गर्दी झाली. त्याचवेळी गुढीपाडव्यामुळे गणपती मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची, वाहनांचीही संख्या वाढली. सराफ कट्ट्यापासून हरभट रोडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे या मार्गावर आयर्विन पुलापर्यंत आणि महापालिका, मारुती रोड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गाला जोडणाऱ्या सर्व उपमार्गांवर वाहतूक ठप्प झाली. तब्बल पाऊण तास वाहने गर्दीत अडकली होती. त्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीसही नसल्याने गोंधळ वाढला. गणपती मंदिरापासून टिळक चौकापर्यंत, टिळक चौकापासून सांगलीवाडीपर्यंत, मारुती रोड, हरभट रोड अशा प्रत्येक मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवजड वाहनांना बंदी असूनही आयर्विन पुलावर अवजड वाहनेही गर्दीत होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी आल्या. विक्रेते, हातगाडीवाले आणि व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे याठिकाणचे सर्व मार्ग सध्या अरुंद बनले आहेत. (प्रतिनिधी)