शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औषध समजून विषारी औषध प्राशन

By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST

मणेराजुरीतील घटना : मातेसह दोन मुलांची प्रकृती अत्यवस्थ

सांगली : आजारावरील औषध पिण्याऐवजी चुकून विषारी औषधाची बाटली हाती लागल्याने त्यातील विषारी औषध प्राशन केल्याने महिलेसह तिच्या दोन मुलांची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे आज (मंगळवार) दुपारी ही घटना घडली. सुनंदा राहुल कुचेकर (वय २६) व त्यांची मुले सानिका (४), शुभम (६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गेल्या चार दिवसांपासून सुनंदा व त्यांची मुले आजारी आहेत. सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांनी स्वत:सह मुलांचीही गावातील डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली होती. डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती. ती त्यांनी औषध दुकानातून खरेदी केली होती. औषधांच्या बाटल्या त्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवल्या होत्या. दुपारी त्यांनी औषधे खाण्यासाठी बाटल्या घेतल्या. स्वत: औषध घेऊन, मुलांनाही त्यांनी पाजले. दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, चुकून आपण औषध पिण्याऐवजी विषारी औषध प्राशन केले आहे. घरातील लोकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. सुरुवातीला त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सायंकाळी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असून, धोका टळला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एक ते दोन चमचे विषारी औषध या तिघांच्याही पोटात गेले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली. तेथील पोलिसांचे पथक तातडीने सुनंदा यांचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. (प्रतिनिधी)औषधाऐवजी विषारी औषधतासगाव पोलिसांनी सुनंदा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, घरात कीटकनाशक औषधांच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आहेत. शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी ही औषधे घरी ठेवण्यात आली आहेत. या औषधांशेजारीच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे चुकून त्यातील विषारी औषधाची एक बाटली हाती लागली. त्यातीलच औषध स्वत: घेतले व मुलांनाही पाजले आहे.