शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

सागरेश्वर अभयारण्याचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेले सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या स्थळाचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी व्यक्त केले.वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व कडेगाव-खानापूर तालुका मराठी साहित्य परिषदेच्यावतीने वृक्षमित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेले सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या स्थळाचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी व्यक्त केले.वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट व कडेगाव-खानापूर तालुका मराठी साहित्य परिषदेच्यावतीने वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त सागरेश्वर अभयारण्यात आयोजित केलेल्या ‘आपली शिदोरी-आपले संमेलन’ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, महेश कराडकर, वनक्षेत्रपाल सतीश साळी, प्रा. श्रीकृष्ण मोहिते उपस्थित होते.आडसूळ म्हणाले, धों. म. अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वृक्षलागवड चळवळ हाती घेणे आवश्यक आहे. या कामात लोकसहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाईने सक्रिय व्हावे. गटविकास अधिकारी रोकडे म्हणाले, महाविद्यालयात असताना या परिसरात आलो आहे. परंतु अधिकारी म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. धों.म.नी सागरेश्वर अभयारण्याच्या रूपाने देशपातळीवर नाव पोहोचवले आहे.यावेळी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे छायाचित्रकार प्रदीप सुतार यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार पुरस्कार रविकांत आडसूळ, राहुल रोकडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.स्वागत साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी केले. आभार बी. एम. जमादार यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. कार्यक्रमास सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. झुरे, प्रदीपकुमार कुडाळकर, अरुण लंगोटे, प्रा. बी. डी. कदम, रामचंद्र यादव, राम सुतार, विनायक सुतार, समीर पाटील, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संदीप नाझरे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.