शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दहा व्हेंटिलेटर घेतले, पण आम्हांला नाही विचारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

सांगली : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने दहा व्हेंटिलेटर खरेदी केले. प्रशासनाने हे व्हेंटिलेटर भाडेतत्त्वावर खासगी रुग्णालयात दिले. पण या ...

सांगली : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने दहा व्हेंटिलेटर खरेदी केले. प्रशासनाने हे व्हेंटिलेटर भाडेतत्त्वावर खासगी रुग्णालयात दिले. पण या साऱ्या घडामोडीबाबत स्थायी समितीचे सदस्य मात्र अनभिज्ञ होते. मंगळवारी सभेत सदस्यांनी व्हेंटिलेटर परस्परच भाड्याने का दिले, आम्हांला का विचारले नाही, असा संताप व्यक्त करीत आरोग्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकाराचा खुलासा होईपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.

सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायीची सभा झाली. गत सभेत स्थायी समितीने दहा व्हेंटिलेटर खरेदीला मान्यता दिली होती. इतिवृत्त मंजुरीवेळी हा विषय निघताच सदस्यांनी हे व्हेंटीलेटर कुठे आहेत? असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला. त्यावर जिल्हा प्रशासनाने शिफारस केलेल्या खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर भाड्याने दिल्याचे सांगण्यात आले. यावर गजानन मगदूम, मंगेश चव्हाण, सविता मदने, संजय यमगर, प्रकाश मुळके आदींनी प्रशासनाला धारेवर धरले.

नगरसेवक मगदूम यांनी व्हेंटिलेटर खरेदीच्या नावावर लुटालुटीचा धंदा सुरू असल्याचा आरोप केला. सविता मदने यांनी महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने सामान्य कोरोना रुग्णाला याचा लाभ व्हावा, यासाठी व्हेंटिलेटर खरेदीला स्थायीने मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात खरेदी केलेली व्हेंटिलेटर आहेत कुठे? खासगी रुग्णालयाला देताना स्थायीला विचारले होते काय? खासगी दवाखान्यात व्हेंटिलेटरची मागणी नसतानाही प्रशासनाने सदस्यांना विश्‍वासात न घेता व्हेंटिलेटर दिलेच कसे? असा सवाल उपस्थित केला.

खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एमडी डॉक्टर सेवेत असणाऱ्या कोविड रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. प्रत्यक्षात बीएचएमएस डॉक्टर असणार्‍या दवाखान्यात हे व्हेंटिलेटर देण्यात आलेले आहेत. ही खासगी रुग्णालये रुग्णांकडून हजारो रुपये लुटत आहेत, असा आरोपही सभेत करण्यात आला.

चौकट

गुरुवारी तहकूब सभा

आरोग्याधिकाऱ्यांकडून खुलासा होईपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोेळे सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे गुरवारपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आल्याचे सभापती कोरे यांनी सांगितले.

चौकट

महापौर, सभापती अनभिज्ञ

स्थायीने ५५ लाख रुपये किंमतीचे दहा व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला होता. मंजुरी मिळताच प्रशासनाने त्याची खरेदी करून शहरातील बड्या रुग्णालयांना भाड्याने दिले. याबाबत स्थायी सदस्यांसह महापौर दिग्विजय सूर्यवंशी व सभापती कोरे हेही अनभिज्ञ होते.