शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आज मोर्चा

By admin | Updated: February 8, 2016 23:25 IST

सामाजिक संघटनांचा पुढाकार : मोटारसायकल रॅलीने शेतकरी सहभागी होणार--‘म्हैसाळ’चे पाणी पेटले

सांगली : जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील पाणीटंचाईची परिस्थिती मिटण्यासाठी आवश्यक असणारे म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार, दि. ९ फेब्रुवारीला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार गणपतराव देशमुख, मानसिंग उद्योग समूहाचे नेते जे. के. बापू जाधव आदी करणार आहेत. या आंदोलनात शिवस्वराज्य, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मिरज पूर्व भागातील कॉँग्रेसचे पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी संसद, मातंग सेवा संघ, मागासवर्गीय संघर्ष समिती, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, डॉ. विठ्ठलराव पाटील कृषी परिषद, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाभिक महामंडळ, वकील संघटना आदी संघटना यात सहभागी होणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी संविधान मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या पुढाकाराने २९ जानेवारीला म्हैसाळ पंपगृहावर मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवार, दि. २ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दररोज एका संघटनेच्यावतीने साखळी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनास जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, उद्या, मंगळवारी होणारा मोर्चा विराट स्वरुपाचा होणार असल्याचा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या आंदोलनात संविधान मोर्चाचे संयोजक चंद्रशेखर पाटील, दीपक पाटील, संजय देसाई, अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अजितराव सूर्यवंशी, माजी सभापती अनिल आमटवणे, प्रा. सिध्दार्थ जाधव, खंडेराव जगताप, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, तानाजीराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत आदी सहभागी होणार आहेत. यात सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, चंद्रकांत पाटील, सुभाष माने, प्रतापसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंग राजेमाने, सूर्यकांत पाटील आदी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) मोटारसायकल रॅलीचे आयोजन बेडग येथील शेतकरी मोटारसायकल रॅलीसह या मोर्चात सहभागी होणार आहेत. मंगळवारी होणारे आंदोलन हे पूर्णपणे राजकारणविरहित असल्याने, अनेक संघटना यात सहभागी होणार आहेत. पाच हजाराहून अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास मोर्चाच्या संयोजकांनी व्यक्त केला.