शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात आजपासून उमेदवारी अर्ज

By admin | Updated: October 24, 2016 00:16 IST

नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार : जिवंत नागपूजेस परवानगीबाबत ठराव

विकास शहा ल्ल शिराळा शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरूवात होत आहे. मात्र ‘नागपंचमीचे बत्तीस शिराळा’ या गावाने जिवंत नागपूजेस जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रकियेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सोमवार दि. २४ ते शनिवार दि. २९ या अर्ज भरण्याच्या कालावधित शिराळकरांच्या खऱ्या एकीचे आणि नागपंचमीबाबतचे प्रेम याचे दर्शन घडणार आहे. गतवर्षी नागपूजेसच बंदी घातल्याने, २००२ पासून चालू असलेल्या विविध आंदोलनास बगल देऊन निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बहिष्काराचा मोठा निर्णय यशस्वी कसा करायचा आणि या नागपूजेला परवानगी कशी मिळवायची, यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी ‘नागपंचमी’ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत नागपंचमी हा विषय वेगाने हाताळण्यास सुरूवात केली. याचे फलित म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी या बहिष्कारास पाठिंबा दिला. निवडणूक बहिष्कारानंतर पहिलीच निवडणूक शिराळा नगरपंचायतीसाठी होत आहे. त्यामुळे हा बहिष्काराचा लढा तीव्र करण्याचा निर्णय झाला. ‘उमेदवारी अर्ज भरणाऱ्यास गाढवाची सवारी’ असे फलकही झळकले. समितीने आपण हा बहिष्काराचा निर्णय का घेतला, न्यायालयीन लढ्यासाठी निधी गोळा करणे गरजेचे आहे, हे सांगण्यासाठी नागरिकांची बैठक बोलाविली. यावेळी नागरिकांतून प्रतिसाद तसेच विविध सूचनाही झाल्या. त्यावेळी ‘नागपंचमीचे बत्तीस शिराळा’ असे नामकरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या वाहनावर तसेच दुकान फलकांवर नावात बदल करून लिहिण्याचे चालूही केले आहे. आता सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे चालू होत आहे. एखाद्याने खोडसाळपणा करू नये यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. समितीने गांधीगिरीने नागपूजेसाठी आंदोलन चालू केले आहे. राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आदी सर्व पक्षांनीही या बहिष्कारास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा बहिष्कार शंभर टक्के यशस्वी होणार, याचा कृती समिती आणि गावकऱ्यांना विश्वास आहे. येथील नागरिकांना कल्पना आहे, नागपंचमी चालू झाली तरच ‘बत्तीस शिराळ्याचे’ नाव राहणार आहे. त्यामुळे शिराळकऱ्यांच्या सर्वधर्मसमभाव, नाग पकडण्याची कला, सर्व मित्र, ऐतिहासिक परंपरा आणि सण यासाठी एकीचे दर्शन घडणार आहे. एस. डी. भोसले : निवडणुकीत सहभागी व्हा शिराळा नगरपंचायत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. भोसले म्हणाले, शिराळा येथील पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण वर्गही झाले आहेत. येथील नागरिकांनीही शिराळा शहराच्या विकासासाठी या निवडणुकीत सहभागी व्हावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.