शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला आजपासून अपुरा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 23:48 IST

नदी कोरडी : धरणातील पाण्याची प्रतीक्षा

सांगली : कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून सांगली व कुपवाड या दोन शहरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कोयना धरणातून सोडलेले पाणी बुधवारपर्यंत सांगलीच्या आयर्विन पुलापर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी दिली. सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी उपसा केंद्राच्या इंटकवेलजवळील पाणीसाठा कमी झाला आहे. कृष्णा नदी कोरडी पडली असून, साठलेल्या पाण्यातूनच शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. कृष्णा नदीत पाणी सोडण्याबाबत महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे वारंवार विनंती केली आहे. आठ दिवसांपूर्वीच महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र देऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. पण कोयना धरणातून सोडलेले पाणी आजअखेर सांगलीत पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे सांगलीच्या पात्रातून बुधवारी रात्री आठपासूनच पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात अपुरा पाणी पुरवठा होईल. कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीत येण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागत आहेत. त्यातच नदीपात्रातील पाणी वाहते नसल्याने नागरिकांनी ते उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. नदीपात्रात पुरेपूर पाणी आल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल, असेही उपाध्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)