शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा पोलिसांच्या मदतीमुळे वेळेत ऑक्सिजन पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा पोलिसांनी भरपावसात झाडे तोडून केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना वेळेत ऑक्सिजन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा पोलिसांनी भरपावसात झाडे तोडून केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध झाला.

आष्टा परिसरात मागील दोन दिवस सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. २६) सायंकाळी पुण्याहून सांगलीसाठी ऑक्सिजनचा टँकर येणार होता. त्याकरता आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज सुतार यांची मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह एस्कॉर्ट अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. ऑक्सिजन गॅसचा टँकर सायंकाळी ७ च्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या जवळ होता. नेमका याचवेळी आष्टा परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला. आष्टा-इस्लामपूर मार्गावरील गाताडवाडी फाट्यानजीक झाडे पडल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांना समजले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी वाहनांची गर्दी होती. रस्ता बंद होऊन वाहतूक काेंडी झाली होती. त्यामुळे मनोज सुतार यांनी एस्कॉर्ट वाहनाने वाळवा मार्गाने इस्लामपूरला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याही ठिकाणी झाडे पडली हाेती. त्यांनी तातडीने आष्टा पोलिसांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र देशिंगे, हवालदार अशोक जाधव, सुधीर पाटील, गणेश माळी, नितीन पाटील यांच्यासह गाताडवाडीचे सरपंच राहुल कदम, पोलीसपाटील नितीन कदम यांनी भरपावसात युद्धपातळीवर काम करून मोठी झाडे कापून ट्रॅक्‍टरच्या साह्याने बाजूला केली. रस्त्यात थांबलेल्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांनी तातडीने एस्कॉर्ट गाडी साताराकडे वळवली व सातारा हद्दीतून ऑक्‍सिजनचा टँकर आपल्या ताब्यात घेतला. यातील ५ टन ऑक्सिजन इस्लामपूर एमआयडीसीत दिला, तर उर्वरित १० टन ऑक्सिजन भारत इंडस्ट्रीज कार्पोरेशन माधवनगर येथे पोहोचवला. रात्री दीडच्या दरम्यान काम फत्ते झाले.

फोटो :

ओळ : आष्टा - इस्लामपूर मार्गावर गाताडवाडी फाटा येथे रस्त्यावर पडलेली झाडे पोलीस व ग्रामस्थांनी बाजूला केली.