शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून वेळकाढूपणा

By admin | Updated: October 18, 2016 23:11 IST

विजयसिंह महाडिक : शिवस्मारक समितीचे पुनर्गठन करा

सांगली : मराठा आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर शासनाने पुन्हा अभ्यास समिती नियुक्त करून वेळकाढूपणा चालवला आहे. मराठा आरक्षणाबाबत आम्ही सर्व ते पुरावे शासनाकडे सादर केले आहेत. त्यामुळे आता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी मंगळवारी येथे पत्रकार बैठकीत केली. महाडिक म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत आजअखेर अनेक समित्या कार्यरत होत्या. राणे समितीने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबतही २००८ मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती. आता पुन्हा समित्या नियुक्त करून त्यातून शासनाला काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पण शासनाकडून केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या ४१ संघटना एकत्र आल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समितीने चर्चा करून मागण्यांचा अंतिम मसुदा दिला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक शिष्टमंडळ भेटले आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे समितीची बैठक झाली. या बैठकीत कोपर्डी प्रकरणाचा सहा महिन्यांत जलद निकाल लावावा, मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, शिव स्मारकाचे काम १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू करावे, छत्रपती शाहू महाराज यांच्यानावे उद्योग, नोकरी, स्पर्धा परीक्षा, विकास प्रशिक्षण संस्था तयार कराव्यात आदी मागण्यांचे ठराव मंजूर केले आहेत. शिव स्मारकाचा आराखडा अद्याप तयार नाही. त्या कामातही शासन दिरंगाई करीत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)तीन कुटुंबांना मदत द्यामराठा आरक्षणासाठी उटगी (ता. जत) येथील तरुणाने आत्महत्या केली, तर क्रांती मोर्चाला येताना तासगाव तालुक्यात अपघात होऊन दोघे ठार झाले. मराठा आरक्षणासाठी तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना शासनाने मदत करावी. मराठा समाजातील नेत्यांनीही या कुटुंबांना उभे करण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी महाडिक यांनी केली. शिराळ्यातील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे, पण त्यावर बंधने घालण्यात आली आहेत. त्याविरोधात शिराळकरांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला समन्वय समितीचा पाठिंबा असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.