शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना हसविणाऱ्या तमाशा कलावंतांवर रडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

सावर्डे (ता. तासगाव) येथे तमाशा फडांचे मालक व कलावंतांची बैठक झाली. यावेळी भास्कर सदाकळे, अमर नागजकर, सुमनताई खरसुंडीकर, लता ...

सावर्डे (ता. तासगाव) येथे तमाशा फडांचे मालक व कलावंतांची बैठक झाली. यावेळी भास्कर सदाकळे, अमर नागजकर, सुमनताई खरसुंडीकर, लता लंका पाचेगावकर, रेणुकाताई खरसुंडीकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दोन वर्षांपासून कोरोनामुळे तमाशातील हंगामी कलावंतांची उपासमार सुरू आहे. त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी कलाकारांनी केली. सावर्डे (ता. तासगाव) येथे तमाशा फडमालक व कलाकारांची बैठक पार पडली.

१५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सर्वप्रथम तमाशा फड सुरू करणारे उमा बाबाजी यांच्या नावाने 'उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार संघटना महाराष्ट्र' या नावाने संघटनेची स्थापना करण्यात आली. संस्थापक-अध्यक्ष म्हणून भास्कर सदाकळे यांची निवड झाली. कलावंतांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलनाचा निर्णय झाला. त्याची सुरुवात तासगाव तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलनाने केली जाणार आहे.

सदाकळे म्हणाले की, लोकसंस्कृती जपणाऱ्या, जनतेला हसविणाऱ्या तमाशा कलावंतांवर उपासमारीने रडण्याची वेळ आली आहे. या संकटकाळात शासनाने आणि समाजानेही मदत करायला हवी.

बैठकीला फडमालक अमर नागजकर, सुमनताई खरसुंडीकर, लता लंका पाचेगावकर, रेणुकाताई खरसुंडीकर यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील तमाशा कलावंत उपस्थित होते.

संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी मंगेश सकट, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सुमनताई खरसुंडीकर, तासगाव तालुकाध्यक्षपदी सलीम मुजावर, महिला आघाडी अध्यक्षपदी लंका कांबळे यांच्या निवडी केल्या. सल्लागार म्हणून डॉ. संपत पार्लेकर, मेजर हनुमंत सदाकळे, भगवान लोंढे यांच्या निवडी केल्या.

चौकट

संघटनेच्या मागण्या अशा...

शासनाने तमाशा कलावंतांना त्वरित आर्थिक मदत करावी, कलावंतांचा समावेश दारिद्र्य रेषेखालील गटात करावा, घरकुले मंजूर करावीत, वैद्यकीय उपचारांसाठी मदत करावी, वृध्द कलाकारांना निवृत्तीवेतन सुरू करावे, फड मालकांना अनुदान दयावे.