शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात घड्याळाची पुन्हा ‘टिकटिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:27 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले जात आहे, तर भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट महाडिक यांनी कोल्हापूर आणि नारायण राणे व्हाया भाजप कोअर कमिटीपर्यंत मजल मारली आहे. यामुळे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना पुन्हा बंडखोरीचे हत्यार उपसावे लागणार ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले जात आहे, तर भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट महाडिक यांनी कोल्हापूर आणि नारायण राणे व्हाया भाजप कोअर कमिटीपर्यंत मजल मारली आहे. यामुळे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना पुन्हा बंडखोरीचे हत्यार उपसावे लागणार का? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सोबत घेऊन विधानसभा लढवायची या प्रयत्नात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांना मिळालेली मते पाहता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याचे नाईक समर्थकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हाताऐवजी आगामी विधानसभा निवडणुकीत घड्याळाची टिकटिक सुरु राहणार आहे.गत विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना साथ द्या, कॅबिनेट मंत्रिपद देतो म्हणून सांगणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिराळा मतदार संघाकडे वळूनही पाहिले नाही.त्यामुळे शिराळा तालुक्यात भाजपचा आलेख कमी होत गेला. तरीसुध्दा आमदार नाईक भाजपची उमेदवारी गृहित धरून विकासाला गती देत आहेत. वाळवा-शिराळ्याबरोबर सांगली-सातारा कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत असलेल्या पेठनाक्यावरील महाडिक पॅटर्नची ताकद राजकारणात नेत्यांनी वापरून स्वत:चा फायदा केला. आता राहुल आणि सम्राट महाडिक यांनी आपला राजकीय पॅटर्न बदलला आहे. आगामी विधानसभा लढवायची तयारी दोघा बंधूंनी केली आहे.त्यातल्या त्यात शिराळा मतदार संघ महाडिक गटाने टार्गेट केला आहे. त्यातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सम्राट महाडिक यांना ऊर्जा दिली आहे. त्यामुळे महाडिक गट कोल्हापूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेऊन अगोदर भाजपची उमेदवारी नाही, तर बंडखोरी या पवित्र्यात आहे.एकंदरीत भाजप विरोधात राष्ट्रवादी अशीच लढत होण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत. भाजपच्या तिकिटासाठी आमदार शिवाजीराव नाईक हे उमेदवार मानले जातात. परंतु सम्राट महाडिक यांनाही भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. आघाडी कॉँग्रेसमध्ये मानसिंगराव नाईक यांना सत्यजित देशमुख यांचा अडसर आहे. यातूनही तडजोडी झाल्यास या मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.राहुल महाडिक : यांचीही तयारी..!वाळवा तालुक्यातून व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी २८ रोजी होणारा आपला वाढदिवसही मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन केले आहे.