शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीस ‘आधार’ जोडण्यास थंडा प्रतिसाद

By admin | Updated: July 6, 2015 00:20 IST

शिक्षकांना कामास जुंपणार : प्रशासनासोबत संघर्षाची चिन्हे

मिरज : मतदार यादीशी आधार क्रमांक लिंक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमास अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मतदार यादीस आधार कार्ड जोडण्याच्या कार्यक्रमास शिक्षकांना जुंपण्यात येणार आहे. आधार लिंक विशेष मोहिमेंतर्गत शिक्षकांमार्फत मतदारांचे अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्च ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधित राष्ट्रीय मतदारयाद्या शुध्दीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मतदार यादीतील ई-पीक या क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करण्यात येत आहे. यासाठी सर्व मतदार सहायता केंद्रात लिंकिंगसाठी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या उपक्रमाला अडीच महिने उलटूनही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे तीन लाख मतदार असलेल्या मिरज मतदारसंघात दोन महिन्यात केवळ ३५ हजार मतदारांनीच आधार लिंकसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३१ हजारजणांचे लिंकिंग पूर्ण झाले आहे. आधार लिंकिंगसोबतच दुबार मतदार कमी करणे व यादीत दुरुस्ती करणे, मतदाराचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी मतदार यादीत समाविष्ट करण्याचे काम करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी आधार लिंकिंग करावे, यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत लिंकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांनी मतदार ओळखपत्र लिंकिंग करण्याकडे पाठ फिरवली आहे. येत्या वर्षभरात कोणतीही निवडणूक नसल्याने राजकीय पक्षांनीही या मोहिमेकडे पाठ फिरवली आहे. संकेतस्थळावरूनही घरबसल्या आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी लिंक करता येणार आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार गौतम साबळे यांनी तालुक्यातील ३५ हजार अर्ज आहेत. या मोहिमेबाबत जनजागृती सुरू आहे. लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना मतदार ओळखपत्र लिंकिंग मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीस आधार कार्ड लिंकिंग करण्यासाठी दि. २८ रोजी बैठक घेऊन शिक्षकांना या कामाला जुंपण्यात येणार आहे. (वार्ताहर)विरोध डावलून निर्णयप्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्डासह अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. निवडणूक व मतदार यादीच्या कामास शिक्षक विरोध करीत असताना, आता पुन्हा मतदार यादीस आधार कार्ड जोडण्याचे काम शिक्षकांकडे सोपविण्यात येणार असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.