शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

टपालातलं प्रेम उरलं मोजक्या टपालप्रेमींपुरतं...

By admin | Updated: October 8, 2015 23:12 IST

पत्रांचा छंद : ई-मेल, एसएमएसच्या गर्दीत ‘गेले ते दिन गेले’; कोट्यवधी पत्रात उरली व्यावहारिकता--जागतिकटपाल दिन

अविनाश कोळी --- सांगली---साध्या टपालातल्या साध्या भावना हृदयाला भारी वाटायच्या. पत्रातली विचारपूस, प्रेमाचा ओलावा दीर्घकाळ टिकून राहायचा. आता ई-मेल, एसएमएस, व्हॉटस् अ‍ॅपच्या दुनियेतल्या भावना क्षणिक असल्या तरी, सध्या त्यांचीच चलती आहे. त्यामुळे टपालाचे ‘ते दिन’ आता कायमचे निघून गेले आहेत. तरीही आश्चर्याची बाब म्हणजे, सांगली जिल्ह्यात अजूनही काही टपालप्रेमींनी टपालातलं हे प्रेम पूर्वीसारखंच जपून ठेवलं आहे. सांगली जिल्ह्यातील वार्षिक पत्रप्रपंच अजूनही कोट्यवधींच्या घरात आहे. भावनेचा झरा आटताना त्याठिकाणी व्यावसायिकता आणि औपचारिकतेचे दगडगोटेच शिल्लक राहिले. अर्थात पूर्णपणे या गोष्टी संपलेल्या असाव्यात, असा समज कोणाचाही होऊ शकतो. मात्र सांगली पोस्टातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टपालातले प्रेम जिल्ह्यातील अनेक टपालप्रेमींनी आजही जिवंत ठेवले आहे. सुंदर हस्ताक्षरात हृदयापासून व्यक्त झालेल्या भावना आजही काही टपालातून दिसतात. पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूपच घटल्याने, ज्या पोस्टमनच्या हाती अशी टपालं पडतात, तेही मग अशा टपालांना न्याहाळून आपुलकीने पाहतात. अशा टपालप्रेमींचे सूर ई-मेल, मोबाईल एसएमएस किंवा व्हॉटस् अ‍ॅपशी कधीही जुळले नाहीत. टपालाच्या जोडीला अनेक प्रकारच्या योजना, कार्डांनी पोस्टात गर्दी केली. साधे टपाल, स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड टपाल यांच्याबरोबरच आता वर्ल्ड नेट एक्स्प्रेस, मोबाईल मनी ट्रान्स्फर, वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फर, ई-पोस्ट, अशा अनेक गोष्टींची रेलचेल पोस्टात सुरू आहे. आधुनिकतेचे बोट पकडून पोस्टाने ग्राहकहिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. परदेशात कोणतीही वस्तू तीन-चार दिवसात पाठविण्याची सोय असलेल्या वर्ल्ड नेट एक्स्प्रेसचे वार्षिक ५00 ते ६00 व्यवहार जिल्ह्यात होताहेत. मोबाईलद्वारे कोणत्याही शहरातून कुठेही अगदी काही मिनिटात पैसे पाठविण्याची सोय असलेल्या मनी मोबाईल ट्रान्स्फरच्या वापरकर्त्यांचीही संख्या वर्षाकाठी सहाशेच्या घरात आहे. आता कार्पोरेट पोस्टपोस्टालाही आता कार्पोरेटचा स्पर्श झाला आहे. ई-पोस्ट कार्पोरेट नावाची यंत्रणा पोस्टात आली आहे. बँका, संस्था, साखर कारखाने, उद्योग यासह कार्पोरेट कंपन्यांच्या नोटिसा, सभांची पत्रे, केवायसीच्या सूचना या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अत्यंत माफक दरात मिळणाऱ्या या सेवेला सहकारी संस्था, साखर कारखाने यांचा प्रचंड प्रतिसाद असल्याची माहिती सहायक अधीक्षक एस. डब्ल्यू. वाळवेकर यांनी दिली. सांगलीचे प्रवर अधीक्षक डी. व्ही. गानमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या पोस्टाने जिल्ह्यात अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत.