शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कारंदवाडीत जाळीत अडकलेल्या मगरीच्या सुटकेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरिकांनी दाखविली आहे. कारंदवाडीमध्ये (ता. वाळवा) शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) एका मगरीची जाळीतून सुटका करत जीवदान दिले.

हाळभागात शेतकरी प्रभाकर पाटील नदीत मोटारीच्या कामासाठी गेले असता, पाण्यात तडफडणारी मगर दिसली. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी पूर्ण पात्रात आडवी जाळी लावली होती. प्रवाहासोबत पोहणारी मगर जाळीत सापडली. सुटण्यासाठी धडपड करताना आणखी फसत गेली.

प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी मगरीच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. काहिलीतून पलीकडील तिरावर गेले. तेथून जाळे कापले. जाळ्यासह मगरीला ओढत पात्राबाहेर जमिनीवर आणले. माणसांची चाहूल लागताच मगर हिंस्त्र बनू लागली, त्यामुळे तिला सोडविणे पाटील यांना शक्य झाले नाही. त्यांनी सांगतील ॲनिमल राहत संस्थेला कळविले. तेथून कार्यकर्ते येईपर्यंत मगरीच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकून शांत करण्याचा प्रयत्न केला.

राहतच्या कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सूर्यवंशी यांनी मगरीवर नियंत्रण मिळवित जाळी कात्रीने कापली. शेपटीपासून कापत तिला पूर्णपणे मोकळे केले. तिच्या तोंडाजवळची जाळी कापणे जोखमीचे होते. पण प्राणीप्रेमींनी धाडस दाखवित सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीची अर्ध्या-पाऊण तासात सुटका केली. जाळी पूर्ण निघाल्याची खात्री झाल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. त्याचक्षणी मगरीने नदीपात्रात धाव घेतली.

चौकट

मच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जिवावर

कृष्णा नदीपात्रात सध्या मुबलक पाणी असल्याने मासेमारीला उधाण आले आहे. अशास्त्रीय पद्धतीच्या मासेमारीमुळे मगरींचे प्राण धोक्यात येताहेत. दोन दिवसांपूर्वी अंकलखोपमध्येही कृष्णेत एका जाळ्यात अडकलेली मोठी मगर दिसून आली, तिची सुटका अजूनही झालेली नाही. जाळ्यात अडकलेल्या स्थितीतच ती नदीपात्रत वावरत आहे.

---------