शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जयंत कबड्डी प्रीमियर लीगच्या थराराला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

इस्लामपूर : येथील जयंत स्पोर्टस्‌च्यावतीने कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जयंत कबड्डी प्रीमियर लीगचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ...

इस्लामपूर : येथील जयंत स्पोर्टस्‌च्यावतीने कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जयंत कबड्डी प्रीमियर लीगचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ६ वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक नगरसेवक खंडेराव जाधव यांनी दिली. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून विजेत्या संघास २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. सहभागी खेळाडूंची तहसील कार्यालय ते क्रीडानगरीपर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे.

जाधव म्हणाले, येथील निनाईनगर परिसरातील जयंत स्पोर्टस् मैदानावर पाच दिवस या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रत्येक संघाची ५० हजार रुपये बोली ठरवून लिलावाद्वारे ८ संघ निवडण्यात आले आहेत. यामध्ये देवराज पाटील यांचा राजारामबापू ईगल्स, कामेरीच्या रणजित पाटील यांचा जगदीशआप्पा रायडर्स, आदितीचे पृथ्वीराज पाटील यांचा आदिती पॅँथर, माजी नगरसेवक शिवाजी पवार यांचा यशोधन चॅलेंजर्स, वाळव्याच्या रवींद्र पाटील यांचा राजेंद्र पाटील भाऊ फायटर्स, अतुल लाहीगडे यांचा एसएल हरिकन्स, लिंबाजी पाटील, ब्रह्मनंद पाटील यांचा नरसिंह टायगर्स आणि जुनेखेडच्या सागर पाटील, नितीन कोळगे यांचा स्फूर्ती रॉयल असे आठ संघ सहभागी झाले आहेत.

दोन गटांत साखळी पद्धतीने या स्पर्धा होतील. १९ फेब्रुवारी रोजी रात्री नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते बक्षीस वितरण केले जाईल. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये रोख, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ७ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासह प्रत्येक दिवसाच्या खेळाचा मानकरी निवडला जाणार आहे. क्रीडा रसिकांसाठी गॅलरीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, तर महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, आयुब हवलदार, क्रांतिप्रसाद पाटील, सदानंद पाटील, सागर जाधव, हमीद लांडगे, विजय देसाई, उमेश रासनकर, राजवर्धन लाड, अतुल लाहीगडे, विजय महाडिक उपस्थित होते.