शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटविले

By admin | Updated: October 25, 2015 00:46 IST

कवठेमहांकाळची घटना : अज्ञाताचे कृत्य; वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील तीन ट्रक अज्ञातांनी शनिवारी पहाटे पेटवून दिले. तिन्ही ट्रकच्या केबिन जळून खाक झाल्या, तर टायरचेही नुकसान झाले. वाळूने भरलेल्या दोन ट्रकचा त्यात समावेश आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दीड महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथून बेकायदा वाळू भरून दोन ट्रक कोल्हापूरकडे निघाले असता, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या पथकाने ते पकडले होते. दंडात्मक कारवाई करण्याच्या हेतूने हे ट्रक कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते, तर तिसरा ट्रक कागदपत्र देवाण-घेवाणीच्या प्रकरणात कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोली येथून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला होता. शनिवारी पहाटे पोलीस ठाण्याच्या आवारात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञातांनी तीनही ट्रकच्या केबिनवर अग्निजन्य द्रव्य टाकून ते पेटवून दिले. केवळ वीस फुटांच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील कोणालाही हा प्रकार समजला नाही. आग भडकल्यानंतर दोघे पोलीस बाहेर आले. त्यांनी लगेच तासगावच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशमक दलाच्या गाड्या आल्या. मात्र, तोपर्यंत केबिन पेटल्या होत्या. अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत इचलकरंजीचे नाना गायकवाड ( केए २२ बी ११६२) व सांगलीचे प्रकाश राठोड (एमएच १० डी ३४६९) यांचे वाळूचे ट्रक तसेच मालकी हक्कावरून वाद असलेला ट्रक ( एमएच ११ ए. एल. ६६७६) जळून खाक झाले . पहाटे लागलेल्या आगीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळापासून जवळच पोलीस ठाणे, पोलिसांचे निवासस्थान, धान्याचे गोदाम, मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, भूमिअभिलेख कार्यालय, मंगल कार्यालये तसेच पश्चिमेला पंचायत समिती, उत्तरेला कोषागार कार्यालय अशी कार्यालये आहेत. गजबजलेल्या या भागातच ट्रक पेटवून दिल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. पोलीस ठाण्याच्या आवारात वाळूने भरलेले अनेक ट्रक लावलेले आहेत. शिवाय अपघातातील वाहनेही याच ठिकाणी लावण्यात आली आहेत. या वाहनांना आग लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून, हवालदार प्रकाश चौगुले पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)