शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकाच्या खूनप्रकरणी तिघे ताब्यात

By admin | Updated: February 1, 2016 01:11 IST

महिलेचा समावेश : धामणी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले; कारण गुलदस्त्यात

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खूनप्रकरणी साखर कारखाना परिसरातील एक हॉटेल चालक, त्याची बहीण व एका रिक्षाचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. होसमणी धामणी रस्त्यावर कशासाठी गेले होते, त्यांच्यासोबत आणखी कोण होते का, याचा शोध घेण्यासाठी रविवारी दिवसभर सांगली ग्रामीण पोलिसांनी धामणी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठे सीसीटीव्ही फुटेज आहेत का? याचा शोध घेतला. त्याला सायंकाळी यश आले. एका शोरुमबाहेरील फुटेज मिळाले आहे. होसमणी यांच्या खुनाला दोन दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला तरी, पोलिसांना अद्यापही त्यांच्या खुनामागचे कारण शोधता आलेले नाही. आर्थिक वादासह अनेक कारणे पुढे येत असली तरी, निश्चित कारण सापडत नसल्याने तपासाला दिशाही मिळालेली नाही. होसमणी वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील त्यांच्या कारखान्यातून रात्री पावणेनऊ वाजता बाहेर पडले होते. त्यानंतर साधारपणे ९.१० ते ९.२० या दहा मिनिटात त्यांचा खून झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. धामणी रस्त्यावर ते का आणि कशासाठी गेले होते? त्यांच्यासोबत मोटारसायकलवर आणखी कोण होते का? ही माहिती काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. कदाचित हल्लेखोरांनी त्यांना तिथे बोलावून घेतले असण्याची शक्यता आहे. होसमणी यांचे माधवनगर ते वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील त्यांचा कारखाना या दोन ठिकाणाशिवाय अन्यत्र कुठेही जाणे-येणे नव्हते. यावरुन हल्लेखोर याच परिसरातील असल्याचा संशय आहे. होसमणी यांच्यासोबत आणखी कोण होते का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने रविवारी दिवसभर धामणी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठे सीसीटीव्ही फुटेज आहे का? याची पाहणी केली. सायंकाळी त्यांना एका शोरुमबाहेर सीसीटीव्ही असल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेदिवशीचे फुटेज मागवून घेतले आहे. पण होसमणी या मार्गावरुन धामणी रस्त्याकडे गेले असले तरच ते त्यात दिसणार आहेत. तरीही पोलिसांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. होसमणी यांनी साखर कारखान्यातील एका हॉटेल चालकासह त्याच्या बहिणीस प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले होते. या रकमेच्या वसुलीवरुन होसमणी यांचा हॉटेलचालक व त्याच्या बहिणीशी वाद झाला होता. खुनामागे हे कारण आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. (प्रतिनिधी)