शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत

By admin | Updated: January 21, 2015 00:21 IST

आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथील अतिक्रमण झालेल्या १२७ खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, खोकीधारकांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे, असा निर्णय आज (मंगळवार) झाला. आष्टा येथे रस्ता रुंदीकरण सुरू असून, या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खोकी हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काल ही मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र आधी पुनर्वसन करण्यात यावे, नंतर खोकी हटविण्यात यावीत, अशी मागणी खोकीधारकांनी केली होती. आज सायंकाळी विलासराव शिंदे, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व खोक्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर खोकी काढून घेण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चेअंती खोकी हटविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय झाला. मात्र यासाठी खोकीधारकांना शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र असणार आहे. या काळात खोकीधारकांनी खोके हटविले पाहिजे, असेही कुशवाह म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सुनील माने, शैलेश सावंत, सुनील भोसले, रवींद्र कण्हेरे, जयदत्त भोसले उपस्थित होते. (प्रतिनिंधी)एसटी महामंडळाशी चर्चा करणार खोक्यांच्या पुनर्वसनासाठी एसटी महामंडळाशी चर्चा करण्याची सूचना विलासराव शिंदे यांनी बैठकीत केली. याबाबत शिष्टमंडळानेच एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा करून करार करावेत, त्यासाठी काहीही हरकत नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले. खोकीधारकांनी अतिक्रमणाच्या जागेत खोकी न ठेवता कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन केले.