२० सुरज नाईक
२० सुलतान शेख
२० नासीर मुजावर
मिरज : मिरजेत बस स्थानक व रेल्वे स्थानक परिसरासह विविध ठिकाणी मोबाइल चोऱ्या करणाऱ्या तिघांच्या टोळीस गांधी चौक पोलिसांच्या पथकाने अटक केली. सुरज उर्फ बापू मंजुनाथ नाईक (वय २५, रा. गांधी चौक, मिरज), सुलतान जिलाणी शेख (वय २१, रा. समतानगर, मिरज) व नासीर दस्तगीर मुजावर (वय १९, रा. इंदिरानगर, मिरज) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचे १४ मोबाइल जप्त केले. तीनही आरोपींना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरजेत एसटी स्थानक व रेल्वे स्थानक परिसरात तिघा जणांची टोळी प्रवाशांचे मोबाइल चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून बसस्थानक परिसरात तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेला एक मोबाइल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी आणखी मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दीड लाखाचे १४ माेबाइल हस्तगत करण्यात आले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांना न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.