शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

तिघांनी गाव सोडले, अनेकांनी घर अन् शेतजमिनी विकल्या; सांगलीतील ऐतवडे बुद्रुकमध्ये सावकारीचा पाश घट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:59 IST

मनाई असतानाही कोऱ्या स्टॅम्पवर सह्या

शंकर शिंदेऐतवडे बुद्रुक : नात्यांचे उपकार एकवेळ फिटतील, पण सावकाराचे कर्ज फिटत नाही, असे म्हटले जाते. तरीही अनेक कारणांनी बँकांकडून झिडकारल्या गेलेल्या लोकांना नाईलाजास्तव खासगी सावकाराचे कर्ज घ्यावे लागते. ऐतवडे बुद्रुकला असाच खासगी सावकारीचा पाश घट्ट झाला आहे. यातूनच तिघांनी घर, गाव सोडले तर अनेकांनी घर व शेतजमिनी विकून सावकाराचे कर्ज फेडले.कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी केली जाते. सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून अनेक बेकायदेशीर सावकार कर्जदारांची लूट करीत आहेत. या लुटीला ऐतवडे बुद्रुक येथील अनेकजण बळी पडले आहेत. किंबहुना तिघांनी सावकाराच्या भीतीने गावातून पलायन केले आहे.दरमहा १० ते २० टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली केली जाते. वसुलीसाठी दमदाटी करणे, रात्री-अपरात्री घरात घुसून शिवीगाळ, मारहाण हे प्रकार नित्याचेच आहेत. छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती हा पाश घट्ट होत आहे.

कायदा काय आहे?राज्य सरकारने २०१४ मध्ये खासगी सावकारी कायद्यात सुधारणा करून सावकारांना हा कायदा बंधनकारक केला. या कायद्यानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे पाच हजार रुपये भरून खासगी सावकारीचा परवाना मिळतो. एप्रिल ते मार्च अशी वर्षभरासाठी याची मुदत असते. मार्चनंतर पुन्हा तीन महिन्यांत परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. कर्ज देण्यासाठीही सावकारांना नियमावली आहे. तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी करता येते, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजाची आकारणी करणे बंधनकारक आहे.

मनाई असतानाही कोऱ्या स्टॅम्पवर सह्यामुद्दल रकमेपेक्षा व्याज जास्त घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊ नयेत, कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, त्याचबरोबर दर तीन महिन्याला त्याला मुद्दल आणि व्याज वसुलीची पावती द्यावी, अशी नियमावली खासगी सावकारांसाठी बंधनकारक केली आहे. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे जिल्ह्यात पेव फुटले आहे. वसुलीसाठी गुंडांची फौजच सावकारांकडे असते.सावकारांची डबल गेम.!वास्तविक व्याजाने दिलेले पैसे हे स्वतः सावकाराचे असतात. मात्र, ते दुसऱ्याचे नाव पुढे करून मध्यस्ती असल्याचे भासवत लोकांना त्रास देतात. अशा डबल गेमचा फंडा सावकार वापरत आहेत. याच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी