शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलवाडीत रस्त्यावर सापडलेले तब्बल तीन लाख रुपये प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : विठ्ठलवाडी-कामेरी (ता. वाळवा) येथील विलास बारपटे हे सकाळी फिरायला गेले असता, त्यांना पाणंद रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककामेरी : विठ्ठलवाडी-कामेरी (ता. वाळवा) येथील विलास बारपटे हे सकाळी फिरायला गेले असता, त्यांना पाणंद रस्त्यावर पसरुन पडलेले तब्बल तीन लाख रुपये सापडले. हे पैसे कोणाचे आहेत, याचा शोध घेऊन त्यांनी, विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराचे असलेले हे सर्व पैसे संबंधिताला प्रामाणिकपणे परत केले. या घटनेने सामान्य माणसात माणुसकी आजही जिवंत आहे, याचे दर्शन घडले.विलास बारपटे हे विठ्ठलवाडी येथील एका सर्वसामान्य कुटुंबातीलच. केवळ २० गुंठे जमीन. दररोज सकाळी ६ वाजता फिरायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. रविवारी सकाळीही ते फिरायला गेले असता, पाणंद रस्त्यावर त्यांना नोटांची बंडले पडलेली दिसली. विलास बारपटेंनी ती नोटांची बंडले गोळा करून जवळ असलेल्या लुंगीत बांधली. तेथून ते येताना, वाटेत भेटणारे, लुंगीत काय आहे? असे विचारत होते. त्यावर बारपटे यांनी आंबे आहेत, असे सांगितले.घरी आल्यानंतर विलास बारपटे यांनी सर्व हकीकत कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी पैशाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला हे पैसे परत करायचे, असे ठरविले. त्यादिवशी दुपारी विलास हे मित्राच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेले.दुपारी परत आल्यानंतर पैशाच्या मालकाचा शोध सुरू झाला. त्याच रस्त्यावर अंगावर पातळाची लक्तरं झालेली एक म्हातारी बाई जे काही बोलत होती, त्यापैकी ‘पाचशेची बंडलं’ हा शब्द विलास यांनी ऐकला आणि ते थांबले. ती म्हातारी त्याच पैशाच्या शोधात फिरत होती. विलासने त्या म्हातारीला घेतले व त्यांच्या खोपटावर गेले. म्हातारी पैसे हरवल्याने रडत होती.बाळू गोपी चव्हाण या मजुराने गावातीलच जोतिराम बापू पाटील या शेतकºयाची विहीर खोदण्याचे काम घेतले होते. त्या कामापोटी ५ लाख रुपये बाळू चव्हाण यांना दिले होते. ते पैसे घेऊन बाळू चव्हाण खोपटावर आले. जेवणाच्या पिशवीत पैसे ठेवले व ते झोपले. रात्री एक भटके कुत्रे खोपटात शिरले. त्याला त्या जेवणाच्या पिशवीचा वास आला. खायला मिळेल म्हणून कुत्र्याने पिशवी पळवली. कुत्र्याने ही पिशवी शेतातील पाणंद रस्त्यावर आणली. पिशवीत खायला मिळेल म्हणून कुत्र्याने पिशवी फाडली अन् त्यातील पैसे बाहेर पडले.हेच पैसे विलास बारपटे यांना सापडले होते. स्वत:ची परिस्थिती बेताची असतानाही बारपटे यांनी प्रामाणिकपणे हे पैसे संबंधिताला देऊन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. विहीर मालक जोती पाटील व प्रा. अनिल पाटील यांना बोलावून हे पैसे बाळू चव्हाण यांना परत केले.विलास बारपटे यांनी एका गरीब, कष्टकरी मजुराचे पैसे प्रामाणिकपणे परत करून, अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.