शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने तीन लाखांचा गंडा

By admin | Updated: February 12, 2017 23:42 IST

सांगलीतील घटना : बनावट नियुक्तीचे पत्र; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : जिल्हा परिषदेत शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विठ्ठल विलास शिंदे (रा. पानाडे गल्ली, खणभाग, सांगली) यांना तीन लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी नोकरी लागल्याचे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. राहुल शंकर भोसले, त्याची पत्नी पूजा व अक्षय साखळकर (तिघेही रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) व सुरेश फोंडे (मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यातील राहुल भोसले हा मुख्य संशयित आहे. विठ्ठल शिंदे यांचे मेहुणे राजू गडकरी हे मिरजेतील सुभाषनगरमध्ये राहतात. संशयित साखळकर याने गडकरी यांची भेट घेऊन, ‘जिल्हा परिषदेत शिपायाच्या जागा निघणार आहेत, माझा खूप वशिला आहे. कोणाला नोकरी लावायचे आहे का?’, अशी विचारणा केली. त्यावर गडकरी यांनी, ‘माझ्या भाचाला नोकरी लावायची आहे’, असे सांगितले. त्यानंतर गडकरी यांनी त्यांचे भाऊजी विठ्ठल शिंदे यांच्या कानावर हा विषय घातला. शिंदे यांचा मुलगा ओंकार यास नोकरी लावण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर नोकरी लावायची आहे, असे त्यांनी साखळकरला सांगितले. साखळकरने गडकरी व त्यांचा भाचा ओंकार यास आॅक्टोबर २०१५ मध्ये राहुल भोसले याच्या घरी नेले. भोसलेच्या घरात नोकरीबाबत चर्चा झाली. यावेळी त्याची पत्नी पूजा, साखळकर व सुरेश फोंडे होते. या सर्वांनी गडकरी यांच्याकडे नोकरी लावण्यासाठी तीन लाखांची मागणी केली. त्याचवेळी गडकरी यांनी हा सौदा मान्य केला. दोन टप्प्यात प्रत्येकी ७५ हजार रुपयेप्रमाणे दीड लाख रुपये दिले. उर्वरित दीड लाख रुपये शिंदे यांनी १२ जानेवारी २०१७ पर्यंत सहा टप्प्यात दिले. तीन लाख मिळाल्यानंतर संशयितांनी नोकरी लावण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी शिंदे यांना त्यांच्या मुलास नोकरी लावल्याचे बनावट नियुक्ती पत्र दिले. तसेच ओळखपत्रही दिले. पण आता लगेच जिल्हा परिषदेत जाऊ नका, जानेवारी २०१७ मध्ये तुमचे काम होईल, असे सांगितले. मात्र जानेवारी महिना उजाडल्यानंतर संशयित गायब झाले. त्यांचे मोबाईलही बंद होते. शिंदे यांनी जिल्हा परिषदेत चौकशी केली असता, शिपाई पदाच्या कोणत्याही जागा निघाल्या नसल्याचे समजले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी)फसवणुकीचीव्याप्ती मोठीसंशयितांनी शिंदे यांच्या मुलासह अन्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाही जिल्हा परिषदेत शिपाई पदावर नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा आहे. फसवणुकीची ही व्याप्ती फार मोठी आहे. संशयितांनी गेल्या वर्षभरात हा सारा उद्योग केला आहे, परंतु सध्या तरी केवळ शिंदे यांच्या माध्यमातून एकच तक्रार दाखल झाली आहे. सुरुवातीला विश्रामबाग पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडे शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची सूत्रे तातडीने हलली.