शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात साडेतीन कोटींचा दंड

By admin | Updated: December 17, 2015 22:55 IST

बेकायदा गौणखनिज प्रकरण : सात-बारावर बोजा चढविला

तासगाव : वाळू, मुरुमासह इतर गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. अशा दंड न भरणाऱ्या ९७ जणांच्या सात-बारावर तब्बल तीन कोटी ५२ लाख १३ हजार १८० रुपयांचा बोजा चढविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी गुरुवारी दिली. यापुढे बेकायदा गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तासगाव तालुक्यात गौणखनिजाची बेकायदा वाहतूक आणि उत्खननासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २०१४ पूर्वी बेकायदा वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीदेखील नोटिसा न बजावणाऱ्या ९७ जणांच्या सात-बारावर बोजा चढविण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले होते. त्यानुसार साडेतीन कोटींच्या बोजाची नोंद संबंधितांच्या सात-बारावर झाली असल्याची माहिती तहसीलदार भोसले यांनी दिली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात २७ लाख ५१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर वर्षभरात दंडात्मक कारवाई करुनही दंड न भरलेल्या आठजणांच्या सात-बारावर १७ लाख ४९ हजार २०० रुपयांचा बोजा नोंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती भोसले यांनी दिली. यापुढे तालुक्यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून बेकायदा उत्खनन आणि वाहतूक होत असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार भोसले यांनी केले. (वार्ताहर)‘मोक्का’अंतर्गत प्रस्ताव देणारबेकायदा गौणखनिजाविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे सुरु करण्यात येणार आहे. चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. शिवाय वारंवार वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचे प्रस्तावही पोलीस विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. अशा घटनांत कोणाचीही गय करण्यात येणार नाही, असे तहसीलदार सुधाकर भोसले म्हणाले.