शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:45 IST

सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरासह परिसरातील गावांतून आलेले मराठा समाजबांधव व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायंकाळी ...

ठळक मुद्देसमाजबांधवांचा मोठा सहभाग; राज्य सरकारविरोधी घोषणा महिला व युवतींकडे दिले आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व

सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरासह परिसरातील गावांतून आलेले मराठा समाजबांधव व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायंकाळी पाचपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते. शांत व संयमाने झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे मराठा समाजाने मूक मोर्चानंतर पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडविले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी क्रांतिदिनी संपूर्ण राज्यभर बंद व ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. सांगलीतही संपूर्ण व्यवहार बंद होते. सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढून कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील स्मारकासमोर समाजबांधव मोठ्या संख्येने जमा होत होते. पश्चिम भागातील काही गावांतून आलेले तरुणही मोटारसायकल रॅलीने सहभागी होत होते.

स्टेशन चौकात आलेल्या समाजबांधवांनी रस्त्यावरच ठिय्या मारला होता; तर अनेकजण आजुबाजूला थांबले होते. मात्र, ठिय्या आंदोलनात सहभागी महिलांनी ठिय्या आंदोलन असल्याने खाली बसण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वजण खाली बसले. आंदोलनादरम्यान वारंवार पावसाच्या सरी सुरू होत्या. पावसाची तमा न बाळगता मराठा समाज बांधव बसून होते. दिवसभरात चार ते पाचवेळा पावसाच्या सरी आल्या; परंतु ठिय्या आंदोलन कायम होते.सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनात कुणीही भाषण केले नाही. तसेच उपस्थितांना सूचना देण्याची व घोषणा देण्याची सूत्रेही महिलांनी स्वत:कडे घेतल्याने आंदोलन शिस्तीत पार पडले. आंदोलनामुळे चौकात होणारी गर्दी लक्षात घेऊन आझाद चौकापासून राजवाडा चौकाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. दुपारनंतर ही वाहतूक सुरळीत झाली होती.

यावेळी आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास शिष्टमंडळ जाणार होते, मात्र जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील हे स्वत: शहरात फिरून आंदोलनाचा आढावा घेत होते. त्यामुळे आंदोलनस्थळीच त्यांना उपस्थित महिलांनी निवेदन सादर केले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.

यावेळी डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, श्रीरंग पाटील, पद्माकर जगदाळे, आशा पाटील, सुजाता भगत, सुप्रिया घाडगे, प्रिया गोटखिंडे, कविता बोंद्रे, सुवर्णा माने, रूपाली राऊत, संगीता शिंदे, स्नेहा सावंत, रोहिणी पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नेतेमंडळी आली : रस्त्यावरच बसकन मारली!ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहरातील विविध भागातून व तालुक्यातील अनेक गावांतील मराठा समाजबांधव आले होते. पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरच सर्वांनी बैठक मारली होती. दुपारी आ. विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, नामदेवराव मोहिते यांच्यासह अनेक नूतन नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सर्वच नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला होता. भर पावसात भिजतच दीड तासाहून अधिक काळ नेत्यांनी सहभाग दाखविला होता.अशा आहेत मागण्या..मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे आहे.मेगा भरतीबाबतही सरकारची घोषणा फसवणूक करणारी असून यामुळे राज्यातील समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ठिय्या आंदोलनस्थळी उपस्थित महिलांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.