शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीय दिशानं लावला आंतरजातीय विवाह सोहळा..

By admin | Updated: June 13, 2017 23:38 IST

तृतीयपंथीय दिशानं लावला आंतरजातीय विवाह सोहळा..

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काही व्यक्ती समाजमान्य चौकटीत बसत नाहीत म्हणून त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं जातं. समाजात वावरणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीही त्यापैकी एक. या व्यक्तींकडे समाज आजही वेगळ्या नजरेनं पाहतो. मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्या साताऱ्यातील एका नवदाम्पत्याने लग्नाची प्रतिज्ञा चक्क तृतीयपंथीयाकडून घेऊन या व्यक्ती समाजाचाच एक भाग असल्याचे दाखवून दिले आहे. इतकेच नव्हे तर आंतरजातीय विवाह करून या दाम्पत्याने जाती-पातीच्या भिंतीला तडा देऊन समाजात आदर्शही निर्माण केला आहे.साताऱ्यात राहणारे धम्मरक्षित श्रीरंग रणदिवे (वय ३०) व स्वाती जयंत उथळे (२९) हे दोघेही मुक्तीवादी संघटेने कार्यवाहक असून उच्चशिक्षीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते या संघटनेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. समाजात आजही अनेक ठिकाणी जातीभेद पहावयास मिळतो. अशा परिस्थितीत जर कोणी आंतरजातीय विवाह करू पाहत असेल तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तीच या विवाहाचे समर्थन करतात. जाती-पातीची ही भींत तोडण्यासाठी आणि समाजात एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी धम्मरक्षित आणि स्वाती यांनी जात-पात न पाहता विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला अन् विवाहाला कुटुंबियांचे देखील समर्थन मिळाले.कोणताही डामडौल न करता धम्मरक्षित व स्वाती यांनी साताऱ्यात ९ जून रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. यानंतर ११ जून रोजी स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दिशा शेख यांनी दाम्पत्यास मिलिंद पवार यांनी लिहिलेली परिवर्तनाची प्रतिज्ञा दिली. डॉ. भारत पाटणकर, शाहीर संभाजी भगत, शीतल साठे, सचिन माने, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. प्रसन्न दाभोलकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते, अभिनेते यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावून नवदाम्पत्यास आशिर्वाद दिले.कोण आहे दिशा शेख ‘शब्दवेडी दिशा’ अशी ओळख असलेल्या दिशा शेख या स्वत: तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपल्या स्वरचीत कवितांच्या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडले आहे. तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलावा यासाठी दिशा शेख प्रबोधनाचे काम करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी एनजीओच्या माध्यमातूनही समाजप्रबोधनाचे काम केले आहे.