शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

By admin | Updated: May 6, 2016 01:18 IST

सत्ताधाऱ्यांकडे गर्दी : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील --इस्लामपूर --नगरपालिका निवडणूक सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आरक्षण सोडतीही काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे, तर विरोधी गटात कलह सुरू आहे. त्यासाठी तिसरा पर्याय असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.इस्लामपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना काय असेल, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. गत निवडणुकीत तीन प्रभागांचा एक प्रभाग अशा पध्दतीने निवडणुका झाल्या होत्या. मात्र यावेळी लहान प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.सध्या पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी ताकदीने रणांगणात उतरणार आहे, तर विरोधकांत आजही एकमत नाही. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांंंमध्ये विजय पाटील, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, संजय कोरे, सौ. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, संजय कोरे यांचे प्रभाग अभेद्य आहेत, तर उर्वरित नगरसेवकांना उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या इच्छुकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे.उरुण परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, इस्लामपूर शहर विभागात मात्र विरोधकांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. महाडिक युवा शक्तीच्या ताकदीवर ओसवाल गु्रप, सतीश महाडिक, चेतन शिंदे, जलाल मुल्ला यांच्यासारखे मातब्बर उमेदवार राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतात, तर व्यापारी वर्गातून एल. एन. शहाही यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. विजय कुंभार विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत असले तरी, त्यांना विरोधकांची एकत्रित ताकद मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांना नगण्य समजत आहेत. प्रभाग रचनेनंतर इस्लामपुरातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग रचनेविषयी अद्याप कोणतेही आदेश पालिकेकडे उपलब्ध नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेविषयी आदेश येण्याची शक्यता आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारीविरोधकांना घेऊनच सत्ताधाऱ्यांविरोधात शहरातील सुशिक्षित आणि चांगल्या वर्गातील उमेदवार एकत्रित करण्याचा विचार आहे. यात यश आले नाही, तर शहरात तिसरा पर्यायही असू शकेल.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.