शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

येडेमच्छिंद्र-वांगी गटात इच्छुकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र-वांगी गटात सर्वसाधारण पुरुषाच्या दोन जागा आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र-वांगी गटात सर्वसाधारण पुरुषाच्या दोन जागा आहेत. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस होती. सहकार पॅनलने उमेदवारी निश्चित करून प्रचारात बाजी मारली आहे, तर संस्थापकने सर्व इच्छुक उमेदवारांसहित प्रचाराचा प्रारंभ केला आहे. यावेळी तिन्ही गटाकंडून येडेमच्छिंद्र व देवराष्ट्रे गावांना संधी मिळेल, अशी सभासदांतून चर्चा आहे.

येडेमच्छिंद्र-वांगी गटात वाळवा तालुक्यातील ६ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. क्रांतिसिंहांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्र येथे सुरुवातीला सहकार पॅनलकडून २१ उमेदवार इच्छुक होते. कृष्णाच्या कार्यक्षेत्रात येडेमच्छिंद्रच्या इच्छुक उमेदवारांची मोठी चर्चा होती. अखेर कासेगाव शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव बाबूराव पाटील यांनी उमेदवारीवरती आपली मोहोर उमटवीत क्रांतिसिंहांच्या साक्षीने प्रचारास सुरुवातही केली आहे.

मनोमिलन होवो अगर न होवो, सुरुवातीपासूनच रयत पॅनलकडे इच्छुक असलेल्या संजय जगन्नाथ पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित धरूनच प्रचारास सुरुवात केली आहे. संस्थापक पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष सुरेश गणपती पाटील व बाबासाहेब वसंतराव पाटील या दोघांनीही उमेदवारीवरती दावा करून प्रचारास सुरुवात केली आहे. दोघांचेही कार्यकर्ते उमेदवारी आपणालाच मिळणार यावरती ठाम आहेत.

सहकार पॅनलकडून अशोक मारुती देशमुख मोहित्यांचे वडगाव व देवराष्ट्रे येथील बाबासाहेब खाशाबा शिंदे यापैकी बाबासाहेब शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. रयतकडून देवराष्ट्रेचे राजाराम रामचंद्र महिंद व बापुसाहेब गणपतराव मोरे यापैकी एकाची, तर संस्थापककडून देवराष्ट्रेचेच माणिकराव आनंदराव मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. संस्थापकचे मोहित्यांचे वडगाव येथील माजी संचालक पांडुरंग मोहिते यांनीही उमेदवारीवरती प्रबळ दावा केला आहे.

चौकट

घाटमाथ्यावरील १५ गावांतून राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलचे रघुनाथ कदम यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने रयतकडून कोणाला संधी मिळते, याची प्रतीक्षा आहे. मंत्री विश्वजित कदम व युवानेते जितेश कदम हेच रयतचे घाटमाथ्यावरील सारथी असणार हे निश्चितच आहे.

चौकट

मनोमिलनाचा बार फुसका ठरल्यास तिन्ही गटांकडून घाटाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्रला प्राधान्य मिळेल, तर घाटमाथ्यावरती महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे गावातूनच तिन्ही उमेदवार येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.