शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

येळावीत उसाचा फड पेटला

By admin | Updated: October 25, 2015 00:38 IST

१५ लाखांचे नुकसान : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

येळावी : येळावी (ता. तासगाव) येथील शेरेकर वस्तीवर चोरून घेतलेल्या वीज कनेक्शनमधून शॉर्टसर्किट झाल्यामुळे उसाच्या फडास आग लागली. आगीत तीन ते चार एकरातील ऊस, ठिबक सिंचन व इत्तर साहित्याचे १५ लाखांचे नुकसान झाले. यशवंत बापू माने व त्यांचा मुलगा अधिक माने यांनी माळरानावर उसाचे पीक घेतले होते. प्रसंगी उसनवार पाणी घेऊन व भरमसाठ पाणीपट्टी देऊन हे पीक बहरात आणले होते. परंतु शेजारील दोन शेतकरी वीजचोरी क रून दोन विद्युत मोटारपंप चालवत होते. यामुळे विद्युत तारेवरील दाब वाढल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या फडाला आग लागली. आग विझविण्यासाठी साधनसामग्री व मनुष्यबळ नसल्याने मोठे नुकसान झाले. याप्रकरणी यशवंत माने यांचे ऊस आणि शेतातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दोन शेतकऱ्यांचा अडीच एकरातील ऊस जळाला आहे. माने यांना दिलासा देण्याऐवजी विद्युत चोरी करणारे शेतकरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार माने यांनी केली आहे. याबाबत तासगाव उपकार्यकारी अभियंता होनमाने यांना याबाबत लेखी तक्रार दिली असता, त्यांनी या विद्युत चोरी केलेल्या शेतकऱ्यांचे लेखी पत्र घेऊन येण्यास सांगितले. येळावीच्या स्थानिक वायरमनने वेळोवेळी या चोरीबद्दल वरिष्ठांकडे माहिती दिल्याचे सांगितले जात आहे, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)