शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मिरजेत हवालदार लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: May 9, 2017 00:01 IST

मिरजेत हवालदार लाच घेताना जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अपघातातील वाहन सोडविण्यासाठी मदत करतो, असे सांगून चार हजारांची लाच घेणाऱ्या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीरंग विठोबा कोळेकर (वय ५३, रा.पोलीस वसाहत विश्रामबाग सांगली) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.श्रीरंग कोळेकर हा मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. महिन्यापूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अपघात झाला होता. या अपघातातील वाहन जप्त करण्यात आले होते. याचा तपास कोळेकरकडे होता. वाहन मालकाने वाहन सोडवून घेण्यासाठी कोळेकर याची भेट घेतली. कोळेकर याने न्यायालयाच्या आदेशाने वाहन द्यावे लागते. यासाठी त्याने चार हजारांची लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिली तरच मदत केली जाईल, असे त्याने सांगितले. त्यामुळे वाहन मालकाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारी चौकशी केली. यामध्ये कोळेकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कोळेकरने वाहनमालकास लाचेची रक्कम सोमवारी रात्री सांगली-मिरज रस्त्यावरील शेख आर्थोपेडिक हॉस्पिटलवजळ घेऊन बोलाविले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावला होता. कोळेकरने लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास पकडले. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)