शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीतील शेतकऱ्यांना अवकाळीची मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

आटपाडी : सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा अनुभव सध्या आटपाडी ...

आटपाडी

: सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा अनुभव सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. अवकाळी पाऊस आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देणार, अशी घोषणा करणाऱ्या सरकारची मदत आता शिमगा जवळ आला तरीही देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अजून किती दिवस वाट पाहायची, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.

गेल्या जूनपासूनच आटपाडी तालुक्यात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे आणि विशेषतः डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे डाळिंबावर केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला. यावेळी शासनाकडून मदत मिळेल, ही आशा मात्र फोल ठरली.

पंचनामे होऊन सहा महिने होऊन गेले; परंतु आटपाडी तालुक्यातील अद्याप दहा गावांतील शेतकऱ्यांना एका रुपयाची शासनाने मदत केलेली नाही.

तालुक्यातील शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्ठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाचीवाडी आणि झरे या गावांतील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी ४ लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.

अतिवृष्टीने ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसाठी दहा हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार हेक्टर या दराने दोन हेक्‍टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

कोट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने मदत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात २७, तर दुसऱ्या टप्प्यात २४ गावांतील शेतकऱ्यांना मदत दिली आहे. उर्वरित दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल.

- सचिन मुळीक,

तहसीलदार, आटपाडी