शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जातपंचायतीच्या शोषणाविरुद्ध लढा गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:27 IST

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, ...

सांगली : जातपंचायतीच्या माध्यमातून जातीअंतर्गत होणाऱ्या शोषणाविरोधातील लढाई कठीण असली तरी, ती आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. इतर जातींकडून होणाºया शोषणाविरुद्ध आवाज उठवला गेला, मात्र स्वत:च्या जातीतील जातपंचायतीच्यावतीने समांतर न्याय व्यवस्था निर्माण करून केल्या जाणाºया शोषणाविरोधात समाजात जागरुकता नाही, असेही ते म्हणाले.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सांगलीत जयहिंद अ‍ॅकॅडमीमध्ये सामाजिक बहिष्कार विरोधी कायदाविषयक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते कायद्याच्या प्रचारासाठी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रकाशन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रधान सचिव प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, प्रशिक्षण कार्यवाह सुनील स्वामी, राहुल थोरात, डॉ संजय निटवे उपस्थित होते.पाटील म्हणाले, कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे समाजातील शोषणाच्याविरोधात संविधानातील मूल्यांना अनुसरून नवीन कायदे बनवणे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन व स्थानिक प्रशासनाला कृतिशील करणे आहे, हे समजून घेतले पाहिजे.अ‍ॅड. मनीषा महाजन यांनी, हा कायदा काय आहे, याची सविस्तर माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, जातपंचायतीच्या शोषणाच्या पहिल्या बळी महिलाच असतात. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जातपंचायत म्हणजे केवळ एकाच जातीचा समूह नसून, मानवाधिकाराला बाधा आणणारे विविध समूह म्हणजे जात पंचायतीच आहेत. अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी जातपंचायतीच्या शोषणाविरोधात या कायद्याशिवाय भारतीय दंडविधानातील इतर कोणती कलमे लावता येतील, याची माहिती दिली.यावेळी रमेश माणगावे, रमेश वडणगेकर, शंकर कणसे, नीशा भोसले, नंदिनी जाधव, अजय भालकर, चंद्रहार माने, राधा वंजू यांच्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.अनुभवकथन...जात पंचायतीविरुद्ध समाजातील काही कुटुंबांवर अन्याय झाला. याविरुद्ध ‘अंनिस’च्या मदतीने लढा देणारी काही कुटुंबे या शिबिरास आवर्जून उपस्थित होती. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला, त्याला तोंड कसे दिले, पोलीस का मदत करीत नाहीत, याबद्दलचे अनुभव कथन केले.