शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी सांगलीत बहुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:57 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात ...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात १२ उमेदवार राहिले आहेत. भाजपचे संजयकाका पाटील, ‘स्वाभिमानी’चे विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर या प्रमुख उमेदवारांसह अन्य पक्ष व अपक्षांमध्ये लढत होणार आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेसह चिन्हांचेही वाटप झाल्याने आता आज, मंगळवारपासून खऱ्याअर्थाने प्रचाराची रंगत वाढणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचीप्रक्रिया २८ मार्चपासून सुरू झाली होती. छाननीत एका उमेदवाराचा अर्ज अवैध, तर उर्वरित २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता बारा उमेदवार नशीब अजमावणार आहेत.अजितराव पाटील, राजेंद्रप्रसाद जगदाळे, अंकुश घुले, ऋषिकेश साळुंखे, नानासाहेब बंडगर, अशोक माने, अल्लाउद्दीन काझी आणि सचिन वाघमारे या आठ जणांनी उमेदवारी मागे घेतली. भाजप व स्वाभिमानी शेतकरी पक्ष या राजकीय पक्षांना त्यांची निवडणूक चिन्हे, तर इतरांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हे देण्यात आली आहेत.चौकटमतदान यंत्रावर असा असेल उमेदवारांचा क्रम१. शंकर दादा माने (बहुजन समाज पार्टी)२. संजयकाका रामचंद्र पाटील (भाजप)३. आनंद शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)४. गोपीचंद पडळकर (बहुजन वंचित आघाडी)५. डॉ. राजेंद्र नामदेव कवठेकर (बहुजन मुक्ती पार्टी)६. विशाल प्रकाशराव पाटील (स्वाभिमानी शेतकरी पक्ष)७. अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष)८. अधिकराव संपत चन्ने (अपक्ष)९. दत्तात्रय पंडित पाटील (अपक्ष)१०. नारायण चंदर मुळीक (अपक्ष)११. भक्तराज रघुनाथ ठिगळे (अपक्ष)१२. हिंमत पांडुरंग कोळी (अपक्ष)