शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या यात्रेत पाच लाख भाविक

By admin | Updated: January 7, 2016 00:59 IST

छबिना फेऱ्यांनी सांगता : यात्रेच्या निमित्ताने दहा कोटींची उलाढाल

जत : पालखी मिरवणूक, छबिना फेऱ्या व किच कार्यक्रमाने जत येथील यल्लम्मादेवी यात्रेची बुधवारी सांगता झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे पाच लाख भाविकांनी यात्रेत उपस्थिती लावली. करमणुकीची साधने, जनावरांची खरेदी-विक्री व एसटी बस वाहतूक या माध्यमातून यात्रेमध्ये सुमारे आठ ते दहा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान यल्लम्मा देवीची पालखी सवाद्य मिरवणुकीने संस्थानिक डफळे यांच्या राजवाड्यावर गेली. तेथे देवीची पूजा, ओटी भरण झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. जत शहरातील ठराविक मानकऱ्यांच्या घरी पूजा झाल्यानंतर पालखीच्या मार्गावरून पुजारी सुभाष कोळी (पुजारी) मंदिरात आले. तेथे त्यांनी अश्वारूढ पूजा केल्यानंतर मंदिराभोवती पालखी मिरवणुकीच्या आणि छबिन्याच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी ‘उदे ग आई यल्लम्माऽऽ’ असा जयघोष केला. भंडारा-खोबऱ्याची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. छबिना फेऱ्या व पालखीची मिरवणूक झाल्यानंतर पुजारी सुभाष कोळी यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सवाद्य मिरवणुकीने किच कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे मानकरी अरुण शिंदे यांनी बकऱ्याचा प्रतिकात्मक बळी दिला. त्यानंतर कोळी यांनी पालखीसमवेत अग्निप्रवेश केला व त्यानंतर यात्रेची सांगता झाली. संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी तसे जाहीर करून, पुढच्या यात्रेची घोषणा केली.नगरसेवक महादेव कोळी, परशुराम मोरे, माजी सरपंच सलीम गवंडी, संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे आदी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन तास वाहनांच्या रांगा...भाविकांच्या परतीच्या प्रवासाने सर्वच रस्त्यांवर दोन-तीन तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किच कार्यक्रमाच्या ठिकाणी लकडकोट व्यवस्थित बांधले नव्हते. याशिवाय तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची रेटारेटी झाली. तेथे गोंधळ उडाला होता. परंतु स्वयंसेवकांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.