शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखू, ३ मेपासून दूधवाटप सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:22 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती

सांगली : राज्यातील भाजप सरकारने शेतकरी संप व लाँग मार्चवेळी दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. सध्या १६ ते १७ रुपये लिटरने दुधाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लिटरमागे दहा रुपयांचा तोटा शेतकरी सहन करू शकत नाहीत. त्यासाठी येत्या ३ ते ९ मे दरम्यान दूध वाटप सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची दखल न घेतल्यास मुंबई, पुण्यासह मोठ्या शहराचा दूधपुरवठा रोखला जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.नवले म्हणाले की, येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संप आणि लाँगमार्चवेळी राज्य सरकारने शेतकºयांच्या मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. सरकारने दुधाला २७ रुपये दर देण्याची घोषणा केली होती; पण गेली वर्षभर दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या दुधाचा दर लिटरला १६ ते १७ रुपये इतका आहे.राज्यात दुधाचा महापूर आल्याचा सरकारचा दावा चुकीचे आहे. शेतकºयांकडून गाय व म्हैशीचे ३.५, ८.५ फॅटचे दूध संकलन करून त्याचे तिप्पट उत्पादन दूध संघातून सुरू आहे. शहरी लोकांना केवळ १.५ फॅटच्या दुधाचे वितरण केले जाते. दुधाची अतिरिक्त निर्मिती ही दूध संघातून होत आहे. त्याला सरकारचे पाठबळही आहे. दुधाचे उत्पादन, वितरण व इतर उत्पादने याची कसलीही आकडेवारी सरकारकडे नाही. आवक कमी व पुरवठा जादा अशी विसंगत परिस्थिती आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कोसळल्याने दूध संघाकडून पावडरची निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात दुधाचा अतिरिक्त पुरवठा दिसून येतो. पण हे सत्य सांगण्याचे धाडस भाजप सरकारकडे नाही. त्यासाठी समविचारी संघटनांना सोबत घेऊन दूध उत्पादक संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्यावतीने येत्या ३ ते ९ मे दरम्यान सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करून सत्याग्रह आंदोलन केले जाईल. भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकाºयांना निमंत्रित करून त्यांना दुधाचे वाटप केले जाईल, असा इशारा नवले यांनी दिला.