शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

चोरी सापडली आणि मोठा अनर्थ टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवांगी : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे व सोलापूर या इंधन वहन करणाºया मोठ्या पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न येवलेवाडी (ता. कडेगाव) येथे करण्यात आला. चोरट्यांनी शेतात लोखंडी पाईपलाईन बसवून एका मोठ्या संकटाला निमंत्रण दिले होते. वेळीच हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्याने एक मोठा अनर्थ टळला.हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कवांगी : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे व सोलापूर या इंधन वहन करणाºया मोठ्या पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न येवलेवाडी (ता. कडेगाव) येथे करण्यात आला. चोरट्यांनी शेतात लोखंडी पाईपलाईन बसवून एका मोठ्या संकटाला निमंत्रण दिले होते. वेळीच हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्याने एक मोठा अनर्थ टळला.हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल, डिझेल व गॅस वाहतूक करण्यासाठी पाच वर्षापूर्वी मुंबई-पुणे ते हजारवाडी (ता. पलूस) व हजारवाडी ते सोलापूर अशी अत्याधुनिक पाईपलाईन केली आहे. ही लाईन कडेगाव तालुक्यातून गेली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्यादरम्यान येवलेवाडी येथील अंकुश यशवंत जगताप यांच्या गट नं. २०५ मधील जमिनीत अज्ञातांनी जेसीबीसारख्या यंत्राने जमीन खोदून इंधन वाहक पाईपला छिद्र पाडले. वेल्डिंग मशीनच्या साहाय्याने दुसरी पाईप जोडून शेताच्या दुसºया बाजूस व्हॉल्व्ह बसवून सर्व पाईप मुजवून टाकली. नवीन केलेली पाईपलाईन दिसू नये म्हणून शेतात रोटर मारला. हा व्हॉल्व्ह चालू केल्यानंतर कंपनीच्या हजारवाडी येथील कार्यालयात पाईपवरील इंधनाचा दाब कमी झाल्याचे लक्षात आले. इंधन चोरी होत असल्याची शंका अधिकाºयांच्या मनात आली. यानंतर तातडीने सर्व कर्मचारी व अधिकारी शोध घेत येवलेवाडी परिसरात घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी तेथून पलायन के ले होते. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक निमेश सिंग यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोलवणकर करीत आहेत.इंधन चोरी झाली नसल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी, घटनास्थळापासून जवळच्या माळरानावर डिझेल सांडल्याचे दिसून येत असल्याने याची जोरदार चर्चा सुरू होती.चोरट्यांचा हा प्रयोग स्फोटक व मोठ्या संकटाला निमंत्रण देणार होता. त्यामुळे ही बाब समोर आल्यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला....अन्यथा गावे पेटली असतीचोरट्यांनी इंधन चोरीसाठी मुख्य पाईपला दुसरी पाईप वेल्डिंगच्या साहाय्याने जोडली, मात्र वेळ चांगली म्हणून इंधनाने पेट घेतला नाही. जर इंधनाने पेट घेतला असता, तर गावेच्या गावे पेटली असती. मोठ्या दुर्घटनेलाच या चोरीच्या प्रकाराने निमंत्रण दिले होते.