शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यकला जिवंत राहणे आवश्यक

By admin | Updated: December 17, 2014 23:57 IST

दयानंद नाईक : ‘एसटी’च्या ४४ व्या आंतरविभागीय स्पर्धेस प्रारंभ

सांगली : श्रमिक लोकांनी नाट्यकला सादर करणे याला अत्यंत महत्त्व असून, कला जिवंत राहणे आवश्यक असल्याचे मत नाट्यदिग्दर्शक आणि माजी नाट्यपरिषद अध्यक्ष डॉ. दयानंद नाईक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागाच्यावतीने ४४ व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धांना येथील भावे नाट्यमंदिरात प्रारंभ झाला. यावेळी डॉ. नाईक यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. डॉ. नाईक म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रमाणात हे नाट्य असतेच. ते व्यक्त करता आले पाहिजे. एसटीतील कर्मचाऱ्यांनी स्वत:चे काम सांभाळून नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. लहानपणापासूनच आपले एसटीबरोबर एक भावनात्मक नाते जोडलेले असते, असेही त्यांनी सांगितले. नाट्य स्पर्धेस सातारा विभागाच्या ‘निष्पाप’ या नाटकाने प्रारंभ झाला. येथील भावे नाट्यमंदिरात दि. १६ ते २० डिसेंबर या कालावधित स्पर्धा होणार आहे. बुधवार, दि. १७ रोजी कणकवली विभागाचे ‘तर्पण’, दि. १८ रोजी लातूरचे ‘सागर’, दि. १९ रोजी रायगडचे ‘थॅक्यू मिस्टर ग्लॅड’, दि. २० चे रत्नागिरीचे ‘द गेम आॅफ डेस्टिनी’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमास अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, प्रतापराव सावंत, अशोक पाखरे, आर. सी. पाटील, वृषाली पोटे, मनीषा पवार, आय. ए. मुजावर, माणिक सुतार, शमू मुल्ला आदी उपस्थित होते. विक्रम हांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)