शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणी डोंगरसोनीत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:47 IST

सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीतील विश्वनाथ सुहास जोशी याच्या सांगलीतील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीतील ...

सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीतील विश्वनाथ सुहास जोशी याच्या सांगलीतील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीतील ‘विजया निवास’ या बंगल्यातून नोटांच्या आकाराची कागदी बंडले व ती कटिंग करण्याचे यंत्र जप्त केले आहे. कोल्हापूरच्या गांधीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच जोशी पसार झाला आहे. त्याचे तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी हे मूळ गाव आहे. रविवारी दुपारी गांधीनगर पोलिसांनी डोंगरसोनी येथेही छापा टाकला. पण त्याचा सुगावा लागला नाही. बनावट नोटांची छपाई जोशीच्या सांगलीतील बंगल्यात केली जात होती, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. अटकेतील अभिजित पवार (रा. उचगाव, ता. करवीर) याची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीतून प्रवीणकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) याचेही नाव निष्पन्न झाले आहे. उपाध्ये व जोशी या दोघांकडून अभिजित पवार हा बनावट नोटा नेत होता.जोशीच्या शोधासाठी शनिवारी रात्री गांधीनगर पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले होते. पथकाने सांगली पोलिसांना कोणतीही माहिती न देता जोशीच्या अरिहंत कॉलनीतील बंगल्यावर छापा टाकला. मध्यरात्रीपर्यंत पथकाने बंगल्याची झडती घेतली. यामध्ये नोटांच्या आकाराची कागदी बंडले मोठ्या प्रमाणात सापडली. तसेच ही बंडले कटिंग करण्याचे यंत्रही सापडले. पंचांसमक्ष हे साहित्य जप्त केले आहे. पथकाने जोशीच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. त्यावेळी हे कुटुंब मूळचे डोंगरसोनीचे असल्याची माहिती मिळाली. पथकाने रविवारी डोंगरसोनीत जाऊन चौकशी केली. मात्र जोशीचा तिथेही सुगावा लागला नाही.अभिजित पवारला कोठडीबनावट नोटा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या गुन्ह्यातील आणखी दोन संशयित विश्वनाथ सुहास जोशी (रा. सांगली) व प्रवीण अजितकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) हे फरार आहेत. अभिजितला गांधीनगर रेल्वे स्टेशननजीक अटक केली होती. त्याने बनावट नोटा सांगलीत तयार झाल्याचे सांगितले आहे.