शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दर उतरूनही ४७ वाळू प्लॉटकडे ठेकेदारांची पाठ

By admin | Updated: April 3, 2015 23:58 IST

प्रशासनाची चिंता : वाळूचे दर उतरले; कर्नाटकातून आवक

अंजर अथणीकर - सांगली --जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉटच्या तिसऱ्यांदा काढलेल्या लिलावांनाही नगण्य प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्लॉटचे दर २५ टक्के कमी करुनही ठेकेदाराने यासाठी निविदा न भरल्याने प्लॉटचे लिलाव होऊ शकले नाहीत. यापूर्वीच चार प्लॉटचे लिलाव झाले असून तेथील उपसा सुरु आहे. सांगली जिल्ह्यात आता कर्नाटकातून भरमसाट वाळूची आवक सुरु झाल्याने वाळूचा दर आता सात हजार रुपयांवरुन साडेचार हजार रुपये ब्रास झाला आहे. जिल्ह्यातील चार प्लॉटचे लिलाव पूर्ण झाले असून, त्यामधून आता उपसा सुरु झाला आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील शिराळा खुर्द, पुनवत व पलूस तालुक्यातील अंकलखोप व दह्यारीचा समावेश आहे. या चार प्लॉटमधून जिल्हा प्रशासनाला ८ कोटी ६४ लाख रुपये महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४७ वाळू प्लॉटचे (शासकीय) दर २५ टक्क्यांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसाधारणपणे एका प्लॉटचा दर ६० ते ७० लाख रुपयांनी कमी झाला आहे. दर कमी करून ई लिलाव काढण्यात आले. यासाठीही एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. यामुळे हा लिलावही आता रद्द झाला. राज्य शासनाने प्लॉटची व्याप्ती चार ते पाच कि.मी.पर्यंत वाढविली. त्यामुळे एकेका प्लॉटचा दर तब्बल दोन ते तीन कोटींपर्यंत गेला होता. आता त्यामध्ये ६० ते ७० लाख रुपये कमी करुनही प्लॉटला मागणी न झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता वाळूचा तुटवडा निर्माण झाल्याने, कर्नाटकातून वाळूची आवक भरमसाट वाढली आहे. त्यामुळे वाळूचा दर सात हजार रुपयांवरुन साडेचार हजार रुपये झाला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. वाळू स्वस्त; खडी, वीट महाग कर्नाटकातून वाळूची आवक वाढल्याने वाळूचे दर आता ब्रासला सात हजारावरुन साडेचार हजार रुपये झाले आहेत. दुसरीकडे वीट व खडीचे दर मात्र वाढले आहेत. पाच हजार ४ इंची विटांचा दर गेल्या पंधरा दिवसात १९ हजार ५०० रुपयांवरुन २२ हजारावर गेला आहे. सहा इंची विटांचा दर वीस हजारावरुन २३ हजार रुपये झाला आहे. खडीचा दरही २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये ब्रास झाला आहे. पाचशे रुपयांनी दरवाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे विटांचे दर वाढले असल्याची माहिती उत्पादकांनी दिली.नआयुक्तांशी सोमवारी चर्चा करणार वाळू प्लॉटचे दर २५ टक्के कमी करुनही वाळू ठेकेदारांनी निविदा भरल्या नाहीत. यामुळे जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉट पडून आहेत. या प्लॉटच्या लिलावासाठी काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याशी सोमवारी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांना याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉटबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या प्लॉटमध्ये पुन्हा किमत कमी होण्याची शक्यता आहे.